Baghdad Murder: प्रसिद्ध टिकटॉक स्टार ओम फहदची (Om Fahad) तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ओम फहद आपल्या घराबाहेर कारमध्ये असताना बाईकवरुन आलेल्या हल्लेखोराने तिच्यावर गोळ्या झाडल्या यात ओम फहादचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. ओम फहद ही इराकची प्रसिद्ध सोशल मीडिया इनफ्लूएंसर (Social Media Influence Murder) होती. इरकाच्या बगदादमधील (Baghdad) जियोन जिल्ह्यत रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. या घटनेची माहिती अलजजीराने दिली आहे.
हत्येची घटना सीसीटिव्हीत कैद
टिकटॉक स्टार ओम फहादच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस त्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक हल्लेखोर मोटरसायकवरुन ओम फवादच्या कारकडे येतो. हल्लेखोराने काळे कपडे आणि काळ्या रंगाचं हेल्मेट परिधान केलेलं आहे. मोटरसायकवरुन उतरल्यानंतर हल्लेखोर काळ्या रंगाच्या एसयूव्हीमध्ये बसलेल्या ओम फहादच्या दिशेने जातो. कारचा दरवाजा उघडत तो ड्रायव्हिंग सिटवर बसलेल्या ओम फहादवर अंदाधुंद गोळीबार करतोत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर मोटरसायकवर बसून फरार होतो.
सीसीटीव्हीची दृष्य पोलिसांच्या हाती लागली असून ओम फहादची हत्या कोणी आणि का केली याचा पोलीस शोध घेत आहेत. हल्लेखोराच्या तपासासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आहे.
Iraqi social media star ‘Influencer’ Om Fahad has been assassinated by Iranian militias of the Hashd Al Shaabi (PMF) today in Baghdad (Iraq)
She didn’t engage in politics or similar but was often attacked by these factions for her ‚liberal lifestyle‘
Enraging: her social… pic.twitter.com/6nOGV5twZL
— ScharoMaroof (@ScharoMaroof) April 26, 2024
कोण आहे ओम फहाद?
ओम फहादचं खरं नाव गुफरान सावादी असं आहे. टिकटॉकवर पॉप म्यूझिकवर डान्स करतानाचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करायची. टिकटॉकवर तिचे जवळपास पाच मिलिअन फॉलोअर्स आहेत. तिच्या काही व्हिडिओंना दहा लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये बगदाद कोर्टाने तिला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. एका व्हिडिओत तीने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.
अलजजीराच्या रिपोर्टनुसार ओम फहादने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवला होता. यावर ती युजर्सला भडकवत असल्याचाही तिच्यावर आरोप आहे. सोशल मीडियावरुन कोणत्याही प्रकारचा कंटेट हटवून नका यासाठी ती इतर कंटेंट क्रिएटर्सन प्रोत्साहित करायची. तीच्या आव्हानानंतर हजारो कंटेट क्रिकेटर्सने रिपोर्ट्स केल्या होते. इराणच्या मंत्रालयाने कठोर पावलं उचलल्यानंतर काही ऑनलाईन कंटेट क्रिएटरने माफी मागत काही कंटेट हटवला होता.
ओम फहादच्या हत्येन बगदादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय मीडियानेही हा प्रश्न गांभीर्याने घेत सरकारला धारेवर धरलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.