लाईव्ह शोमध्ये अँकरने मागितली सॅलरी, व्हिडीओ व्हायरल

लाईव्ह शो दरम्यान अँकर असं काही बोलला की सर्वजण आश्चर्यानं पाहातच राहिले...नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ  

Updated: Jun 27, 2021, 08:12 AM IST
लाईव्ह शोमध्ये अँकरने मागितली सॅलरी, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई: जगभरात कोरोनाची लाट आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये आजही लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये न्यूज चॅनल सुरू आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या सर्व बातम्यांचे अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 24 तास चॅनलमधील सर्व यंत्रणा काम करत असते. अँकरचं काम बातम्या सांगणं आहे मात्र त्यांच्या समस्या फार कोणाला दिसत नाही. लाईव्ह टीव्ही शो किंवा महाचर्चा सारखे शो खूप चर्चेत राहातात त्यावरून वादही होतात. मात्र एका अँकरने चक्क लाईव्ह शो दरम्यान आपली सॅलरी देण्याची मागणी केली आहे. 

केबीएन टीव्हीचा अँकर काबिन्दा कलीमिना याने चक्क लाईव्ह शोमध्ये आपला पगार देण्याची मागणी लावून धरली आहे. त्याने फेसबुकवरही काही पोस्ट शेअर करत आपला पगार चॅनलनं द्यावा अशी मागणी केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

काबिन्दा कलीमिनाने रोजच्या प्रमाणे आपलं बुलेटिन सुरू केलं. मात्र अचानक त्याने आपला सूर बदलला आणि ऑफिसमध्ये पगार न झाल्यानं काय परिस्थिती ओढवली हे प्रेक्षकांना सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे भावुक झालेल्या काबिन्दा याने आपलं दु:ख प्रेक्षकांसमोर ठेवलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

न्यूज अँकरने KBN TVच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावले आहेत. अँकर व्यतिरिक्त आम्हीही एक माणूस आहोत. आम्हालाही काही गरजा आहेत. त्यामुळे आमचा पगार द्या अशी मागणी न्यूज अँकरने लाईव्ह शोमध्ये केली आहे. हे सांगायलाही खूप खेद वाटतो की आम्हाला आतापर्यंत पगार देण्यात आलेला नाही असंही अँकरनं सांगितलं आहे.