पुणे : ऐतिहासिक सिंहगडावर एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. इथल्या दूरदर्शन केंद्राच्या आवारात तिथला एक कर्मचारी विवस्त्र अवस्थेत बसून होता.
दुर्गप्रेमी कार्यर्त्यांनी त्याला हटकलं तेव्हा वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून सूर्य स्नान घेत असल्याचं त्यानं सांगितलं. या प्रकारामुळे दुर्गप्रेमी संतापलेत.
आक्षेपार्ह वर्तन करणा-या कर्मचा-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचं नाव लतीफ सय्यद असं आहे. सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या परिसरात अनेक अनैतिक गोष्टी चालत असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केलाय.
अशा घटनांमुळे सिंहगडाचे पावित्र्य राखलं जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सिंहगडावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येंनं असतात. असं असताना या कर्मचाऱ्याचं वर्तन संतापजनक आहे.