राज आणि उद्धव यांचं अनोखं `बंधुप्रेम`!

राज-उद्धवमध्ये सीझ फायर ? ... गेल्या काही महिन्यांत दोघांची एकमेकांवर टीका नाही... निवडणुकीआधी काय शिजतंय शिवसेना- मनसेत ?... सेना-मनसेत तयार होतोय "अंडरस्टँडिंग" फॉर्म्युला ?...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 7, 2013, 04:32 PM IST

www.24Taas.com, झी मीडिया, मुंबई
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू अलीकडच्या काळात एकमेकांवर टीका करणं टाळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधली ही अंडरस्टॅँडिंग तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अंडरस्टँडिगचा हा फॉम्युला उमेदवार ठरवताना कामी येणार का असाही एक तर्क लढवला जातोय...
राज-उद्धवमध्ये सीझ फायर ? ...
गेल्या काही महिन्यांत दोघांची एकमेकांवर टीका नाही...
निवडणुकीआधी काय शिजतंय शिवसेना- मनसेत ?...
सेना-मनसेत तयार होतोय "अंडरस्टँडिंग" फॉर्म्युला ?...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे... रक्ताने चुलत बंधू, पण एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक. गेल्या आठ वर्षांत एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणा-या या दोघा भावांमध्ये सध्या कमालीची शांतता दिसतेय. लोकसभा निवडणुक जवळ येतेय तसं या दोघांमधली सीझ फायर प्रकर्षानं जाणवतेय.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर उद्धवना पक्षावर आपली पकड आणखी मजबूत करायची आहे, तर राज ठाकरेंना दिल्लीत मनसेचा आवाज घुमवायचा आहे. आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्धवना खासदारांची संख्या वाढवावी लागेल तर राज ठाकरेंना खासदार रुपानं लोकसभेत मनसेचं खातं उघडावं लागेल. भूतकाळातील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता पाडापाडीच्या राजकारणात या दोघांच्याही उद्दिष्टांना पुन्हा छेद जाऊ शकतो. त्यामुळेच एकमेकांमध्ये अंडरस्टॅँण्डिंगची व्यूहरचना आखली जातेय अशी चर्चा आहे. त्यासाठी दुसऱ्या फळीतले नेते काम करत आहेत. अंडरस्टँडिंगची व्यूहरचना याआधी स्थानिक निवडणुकीच्या राजकारणात दिसून आली होती.
आता लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई, कल्याण, पुणे नाशिक या मनसेसाठी ए प्लस जागा मानल्या जात आहेत. शिवसेनेनं ग्रामीण भागात चांगली बांधणी केलीय. त्यामुळे यावेळी निवडणुकीसाठी उमेदवार ठरवतानाही दोन्ही पक्षात अंडरस्टँडिग होणार का? याबाबत उत्सुकता आहे. त्यात भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यानं शिवसेना- मनसेच्या अंडरस्टॅँडिगच्या त्यांनाही हातभारच लागणार आहे. शिवसेना-मनसेची ही अंडरस्टॅँडिगची खिचडी खरंच शिजणार की, ही मांडवलीची व्यूहरचना शेवटी अफवाच ठरणार, याकडे आता लक्ष असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.