शिवसेनेला अपशकून करणाऱ्यांची काय स्थिती आहे... सांगतायत सुभाष देसाई

शिवसेनेला अपशकून करणाऱ्यांची काय स्थिती आहे... सांगतायत सुभाष देसाई

दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंची सहा वर्षं हिंदी आणि इंग्रजी शिकण्यातच जातील, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावलाय. शिवसेनेला ज्यांनी अपशकून केला ते छगन भुजबळ तुरुंगात गेले, राणे महाराष्ट्रातून बाहेर गेले आणि गणेश नाईक घरी बसलेत... अशा शब्दांत देसाईंनी शिवसेना सोडलेल्या नेत्यांवर तोफ डागली. 

VIDEO : 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

VIDEO : 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

तुरुंगातून सुटलेला सलमान खान जोधपूरहून मुंबई विमान तळावर दाखल झालाय.  सलमान परतणार म्हणून मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरासमोर चाहत्यांनी एकच गर्दी केलीय. एका विशेष विमानानं सलमान मुंबईत पोहचला

व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल. 

#आयपीएल२४तास : कुठे, कधी, लाईव्ह स्ट्रिमिंग... सर्व काही!

#आयपीएल२४तास : कुठे, कधी, लाईव्ह स्ट्रिमिंग... सर्व काही!

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०१८ चा धमाका आजपासून सुरू होतोय. पहिलीच मॅच रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जस यांच्यामध्ये... यापूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलचा रंगतदार ओपनिंग सेरेमनीही रंगणार आहे. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, जॅकलीन फर्नांडिस, तमन्ना भाटिया यांसारखे कलाकार दमदार परफॉर्मन्स करणार असल्यानं या सोहळ्याची उत्सुकता आणखीनच ताणली गेलीय. 

'बाबूमोशाय बंदूकबाज'नंतर आता या सिनेमात दिसणार बिदिता बाग

'बाबूमोशाय बंदूकबाज'नंतर आता या सिनेमात दिसणार बिदिता बाग

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत 'बाबूमोशाय बंदूकबाज'मध्ये दिसलेली अभिनेत्री बिदिता बाग लवकरच आणखी एका सिनेमात दिसणार आहे. 'मोक्ष टू माया' या महिला अत्याचारावर आधारित सिनेमात बिदिता दिसणार आहे. 

कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नाकडे मनसेचं दुर्लक्ष झाल्याची कबुली

शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नाकडे मनसेचं दुर्लक्ष झाल्याची कबुली

शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे मनसेनं दुर्लक्ष केल्याची कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. मात्र आता ही चूक सुधारत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.

#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.

मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणानंतर मंत्रालयासमोर आणखी एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडलीय. 

राज ठाकरेंच्या 'साबणांच्या बुडबुड्यां'ना गडकरींनी असं दिलं प्रत्यूत्तर

राज ठाकरेंच्या 'साबणांच्या बुडबुड्यां'ना गडकरींनी असं दिलं प्रत्यूत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली होती. ही टीक गडकरींना चांगलीच झोंबलीय.