दयाशंकर मिश्र : जो आपल्याला सर्वात प्रिय आहे, त्याची जागा कुणी दुसरा घेऊ शकतो. याचा विचार करून कपाळावर आठ्या पडतात. ब्लड प्रेशर वाढू लागतं. तुमच्या आत जेम्सबॉन्डच्या आत्मा प्रवेश करतो, सर्व क्षमता, संवेदना तिसऱ्याला शोधण्याच्या प्रयत्नात कामाला लागते.
जीवनाची वळणं, डोंगरावरील वळणापेक्षा अधिक धोकायदायक असतात. ज्या प्रकारे पर्वतावरील धोकादायक वळणं पार केल्याशिवाय, ईप्सित साध्य होत नाही. तसंच जीवनातील नात्यांचा ताण सहन केल्याशिवाय हे शक्य होत नाही. आपण कुणाला बदलू शकत नाही, हे जीवनात आपल्याला जेवढ्या उशीरा समजलेलं असतं, तेवढा जीवनातील सुख आणि आनंद आपण कमी घेतलेला असतो. आपण एकमेकांच्या अशा सवयींमध्ये अडकलो आहोत, ज्या एकमेकांना आवडत नाहीत. तेव्हाच तंत्रज्ञान आपल्या खासगी जीवनात, आपली परीक्षा घेण्यासाठी दाखल झाली आहे. गॅझेट, मोबाईल आता शरीराच्या पुढे आत्माच्या जवळ पोहचू लागले आहेत.
यावेळी भारत, परदेशातील मानवता, संसाराच्या नात्यातील सर्वात मोठं आव्हान मोबाईलकडून दिलं जात आहे. ज्या मोबाईलला आपण सुविधेच्या नावावर अनिवार्य करून घेतलं आहे. पण मोबाईलने आपल्याला जीवनात गुणवत्तेच्या नावावर काहीही दिलं नाही. हो हे नक्की आहे की, मोबाईलने वेग दिला. पण हा वेग खड्डे पडलेल्या रस्त्यावर कार प्रतितास १०० किमी वेगाने चालवण्यासारखं आहे. भारतात मोबाईल नात्यांच्या बाबतीत धोकादायक काम करतोय.
खरं तर मोबाईल हा दोन लोकांमध्ये असणारा तिसरा बनला आहे. ज्याच्या कक्षेत दहा बाय वीसमध्ये राहणारे दोन जण आहेत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडात एका मुलीने यासाठी आत्महत्या केली. कारण, तिच्या मित्राने तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. भारतात अशा प्रकारच्या ‘शाॅर्ट टेंपर्ड’ बिहेवियरची समस्या वाढत चालली आहे.
मोबाईलपासून होणारे आजार, हा वेगळा वादाचा विषय आहे. भ्रम एवढे होत आहेत की, सत्य शोधण्याची अपेक्षाच आता जुनी होत चालली आहे.
आतापर्यंत आपण नोमोफोबिया (ज्यात आपल्याला सतत वाटत असतं की मोबाईल वाजतोय) आणि टेक्स्ट्राफिनिया (ज्यात आपल्याला नेहमी नोटीफिकेशन आणि एसएमएस न पाहिल्याची चिंता वाटत असते) बद्दल बोलत होतो, पण आता मोबाईलचा धोका आणखी अनेक बाबतीत, कितीतरी पटीने वेगाने वाढत आहेत.
जे साक्षर नाहीत, ज्यांना तंत्रज्ञान कळत नाही, तरीही आपले फोटो काढून ते मोबाईलची गॅलरी भरतात, त्यांच्यासाठी ‘ऑटो सिंक ऑप्शन’ जीवघेणं ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी आग्रामध्ये असंच झालं, एका प्रकरणात पत्नीने पतीच्या विरोधात, हनीमून दरम्यान अंतरंग फोटो, फेसबुकवर टाकल्याचा गुन्हा दाखल केला होता. सायबर क्राइम टीमला तपासादरम्यान लक्षात आलं की, त्या महिलेच्या मोबाईलमध्ये ‘ऑटो सिंक ऑप्शन’ ऑन होतं, ज्याबद्दल त्यांना माहित नव्हतं, म्हणून फेसबुकवर अंतरंगाचे फोटो प्रकाशित झाले.
आता यात दोष मोबाईल फोन, फेसबुक की प्रत्येक वस्तूंचे फोटो घेणाऱ्या माणसाचा आहे, यावर वाद होवू शकतील. पण यावर नक्कीच वाद नसेल की, आपल्याला प्रत्येक गोष्ट हवी असते. ज्याची फॅशन होत चालली असेल, अशा गोष्टींचे आपण सहज चाहते होतो. यातून आपलं घर जळत असेल, आपली नाती खराब होत असतील, तर त्याची जबाबदारी दुसरीकडे ढकलली जाईल.
अमेरिका, ब्रिटनमध्ये मोबाईलचा जीवनावर झालेला शोधाचा सारांश फक्त एवढाच आहे की, ते एक उपकरण आहे, त्यापेक्षा जास्त काहीच नाही. यासाठी रात्रीची झोप, दिवसाचा प्रसन्नपणा गमावू नका. रात्री झोपताना त्याला दूर ठेवा. अलार्मसाठी घड्याळाचा वापर करा, वेळ पाहण्यासाठीही घड्याळाचा वापर करा.
आणि सर्वात महत्वाची बाब आहे, आपल्यातील लोकांना भेटून संवाद साधा. शेजारी, मित्र, मोबाईवर तासनसात बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा समोरासमोर १० मिनिटे बोला.
फेसबुकवरील ‘लाइक डिफिशियंसी’ पासून वाचा. आपली पोस्ट टाकून तेथून निघून जा. खासगी फोटोंच्या टीआरपीच्या शोधात आपल्या नात्यांचा डाव मांडू नका.
यासाठी मोबाईल, तंत्रज्ञान संबंधांची भिंत बनण्यापासून वाचा. या गोष्टी तुमच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या आहेत. या गोष्टींना आत्मियता, स्नेह-भावनेतील गतिरोधक समजू नका. या दोन गोष्टीमध्ये तिसऱ्याला न येऊ देता, जीवनाचा खरा आनंद घेणे शक्य आहे.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)