दयाशंकर मिश्र : जीवनाचा आनंद कशात आहे, पहिला पर्याय - इच्छा पूर्ण होण्याची वाट. दुसरा, मनाची इच्छा पूर्ण होण्यात. पसंती सर्वांची आपआपली असते. पण हे नक्की आहे की, या दोन्ही पर्यायात अंतर कमी आहे. वाट पाहणे पूर्ण झालं की, मन दुसरीकडे धाव घेतं इच्छा पूर्ण करण्याची ओढीने, आपण आजच्या दिवसाकडे दुर्लक्ष करतो, खरं तर हे एक मानसिक सुख आहे, दुसरं काही नाही.
ज्या गोष्टीची कमतरता आपल्याला आज सर्वात कमी जाणवत आहे. ती आहे समाधान. ऐकण्यात हे तुम्हाला 'थ्योरिटकल', कायमचं जुनाट वाटू शकतं. पण इकडे एका दशकात जीवनात आलेल्या बदलावर नजर टाकली तर लक्षात येईल, गोष्ट एवढी जुनी देखील नाहीय.
या आधी आपण खूप समाधानी होतो, सुखात होतो, जीवनातील मूळ संकल्पनेत खूप मोठा विश्वास असल्याने, समाज याआधी खूप समाधानी होता. हळू हळू जीवनात सुविधा वाढत चालल्या आहेत. संवादाची जागा, सोशल मीडियाने घेतली आहे. आता आपण समोरा-समोर बसून बोलण्याऐवजी, एकमेकांना, चमकणारी, पण एकट्या स्क्रीनवर भेटतो. एक दुसऱ्याला जाणून घेण्यासाठी वास्तवतेच्या जागी काल्पनिक माध्यमांची जागा घेतली आहे.
यासोबत आपलं करिअर, पगार, इच्छा यांनी वेगवेगळ्या खिडक्या उघडल्या आहेत. आधी आपण परिवारात करिअरविषयी बोलत होतो, आता करिअरसोबत परिवार आलं आहे. पहिल्यांदा आईवडिलांचा विचार करून नोकरी निवडली जात होती. आता त्यांना कसं एडजेस्ट करायचं याला महत्व दिलं जातं. कंपनीत जो एचआर विभाग असतो, तो देखील विचार करतो की, अशा व्यक्तीला निवडलं जावं, ज्याच्याकडे जबाबदारी कमी आहे. ज्यामुळे तो आपलं संपूर्ण लक्ष कंपनीच्या कामावर देऊ शकतो.
या प्रकारे प्रगतीच्या नावावर जी नवी मोठी ऑफर मिळते, तर ती ऑफर खरं पाहिलं तर जीवनातील अनेक सुखाचा त्याग करण्याची चुकवलेली किंमत असते. जोपर्यंत ऑफर आली नाही, ते एक स्वप्न आहे. पण ती ऑफर मिळाली की आपलं पाऊल आणखी पुढे पडतं. कारण गरजा आपल्या मनाच्या गतीला वाढवत जातात. इच्छा, आकांक्षांचा अमरवेल आपलं सामाजिक रूप विस्कटून टाकतो, आणि तेच मोठं कारण आहे.
आपली संवेदना वन-वे सारखी झाली आहे. ज्यात एकाबाजून मार्गक्रमण करावं लागलं, यासाठी कोणी दुसरं नाही, आपण सर्वात जास्त दोषी आहोत. स्वत:ला आपण असं ट्यून केलं आहे. ज्यात आपण जगाच्या नजरेत प्रगती तर करून घेतो, पण आतल्या आत पोकळपणा वाढत जातो.
सुखाला धन, साधन यांच्यासोबत जोडणं, सुखावर अन्याय करण्यासारखं आहे, सुख समाधानाच्या नदीत प्रवास करत असतं, त्याला तुमच्या प्रगतीशी जोडू नका. त्याला मनाची शांती, स्नेह, आत्मियताशी जोडा. तेव्हा सुखी होण्याचा भाव प्रकट होईल.
मुलं, कुटूंब आणि मित्र यांच्यासोबत बोलण्याचा, राहण्याचा, वेळ घालवण्याचा वेळ सतत कमी होत चालला आहे. ज्यांच्या स्नेहाच्या ऊन्हात, आत्मियतेच्या सावलीत, जीवनाचा पाया रचला गेला. त्यांच्या या किंमतीवर शोधलेलं सुख, हे खरं सुख आहे. जे पालखीत बसून घराच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचलं.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)