close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हुरियत व दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळा!

Updated: Aug 17, 2017, 09:16 PM IST
हुरियत व दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळा!

हेमंत महाजन / मुंबई :

देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांना एकूण ११२ शौर्य पदकांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. यामध्ये एकूण पाच किर्ती चक्र, १७ शौर्य चक्र, ८५ सेना मेडल (शौर्य), ३ नौसेना मेडल व २ वायू सेना मेडलचा समावेश आहे. किर्ती चक्रासाठी सीआरपीएफचे चेतन कुमार चिता व गढवाल रायफलचे मेजर प्रीतम सिंह यांच्यासह गोरखा रायफलचे हवलदार गिरीश गौरांग, नागा रेजीमेंटचे मेजर डेविड मेन्लम व सीआरपीएफचे कमांडर प्रमोद कुमार यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शौर्य पुरस्कारमध्ये १७ पैकी एकूण ६ जवानांना मरणानंतर शौर्य चक्र जाहीर करण्यात आले आहे. 

कसेही करून काश्मीर खोरे धुमसत ठेवायचे, स्वतःची मुले देश-विदेशातील नामांकित शाळा-महाविद्यालयांत शिकायला पाठवायची आणि इकडे निष्पाप मुलांची माथी भडकावून त्यांना दगड उचलण्यास प्रवृत्त करायचे, हा फुटीरतावाद्यांचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. काश्मीर प्रश्‍नावर आपली पोळी भाजत असलेले फुटीरतावादी नेते चांगलेच गब्बर बनलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. 

काश्मीरमधे अशांतता पसरवण्यासाठी अर्थ सहाय्य पुरवणाऱ्यांविरुद्ध ४ जूनला राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मू-काश्मीर, दिल्ली व हरियाणात नव्याने छापे घालण्यात आले. काश्मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मूमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

तेहरिक-ए-हुर्रियतचा नेता सय्यद अली शाह गिलानी याचे सहकारी अझाज अकबर आणि जावेद अहमद बाबा तथा गाझी बाबा यांच्या घरावर, तसेच तेहरिक-ए-हुर्रियतच्या कार्यालयावर छापे घालण्यात आले. या छाप्यांमध्ये पाकिस्तानी चलनातील काही हजार रुपये, संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया या देशांची चलने जप्त करण्यात आली आहेत. 

एका वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तेहरिक-ए-हुर्रियतचा सदस्य नईम खान याने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतल्याचे मान्य केल्याचे उघड झाल्यानंतर एनआयएने आपली कारवाई पुन्हा सुरु केली. आतापर्यंत घातलेल्या छाप्यांमध्ये १.१५ कोटींची रक्कम, मालमत्ता विषयक कागदपत्रे, लष्कर-ए-तैयबा आणि हिझबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड्स, पेनड्राईव्ह, लॅपटॉप इत्यादी सामान जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत जम्मु काश्मीरमधील १४ठिकाणी, दिल्लीमधील सात ठिकाणी तसेच हरियानामधील एका ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. 
 
एनआयएच्या छाप्यात ४० लाखाचे सोने व महत्त्वाचे कागदपत्रे जप्त

फुटीरतावादी नेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएने ३ जूनला टाकलेल्या , छाप्यांमध्ये 'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' यांसारख्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड, पेनड्राइव्ह ,काही दस्तावेज आणि लॅपटॉप अशी सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमधील वेगवेगळ्या २३ ठिकाणी तपास यंत्रणेने छापे टाकले.

त्यांमध्ये फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी याचा जावई अलताफ फंटूश, व्यापारी जहूर वाटाली, मीरवाईज उमर फारुख यांच्या नेतृत्वातील आवामी अॅक्शन कमिटीचे नेता शाहिद-उल-इस्लाम व फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे खोऱ्यात १९९० च्या दशकाच्या सुरूवातीला दहशतवाद फोफावल्यानंतर टाकण्यात आलेले अशा प्रकारचे हे पहिलेच छापे आहेत. हे छापे टाकण्यापूर्वी 'एनआयए'ने २९ मे या दिवशी तहरीक-ए-हुर्रियतच्या तीन फुटीरतावादी नेत्यांना फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, नईम खान आणि जावेद अहमद बाबा उर्फ गाजी यांचीही चौकशी केली होती. मतपेटीच्या राजकारणामुळे या पूर्वी असे छापे कधीच टाकले गेले नव्हते.

छाप्यात जप्त करण्यात आलेल्या रकमेचा वापर खोऱ्यात विध्वंसक कारवायांसाठी करण्यात येत होता. यापूर्वी २००२ या वर्षात आयकर विभागाने गिलानींसह हुर्रियत नेत्यांची चौकशी केली होती. त्यावेळी काही रोकड आणि दस्तावेजही जप्त करण्यात आले होते. तथापि, त्यावेळी कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
'एनआयए'ने या प्रकरणी 'लष्कर-ए-तोयबा'चा म्होरक्या हाफिज सईदसह कट्टर फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी आणि जम्मू अँड नॅशनल फ्रंट चेअरमन नईम खान यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. फुटीरतावादी नेत्यांवर लष्करचा म्होरक्या हाफिज सईदकडून पैसे घेतले असा गंभीर आरोप आहे.

५ जूनला जम्मू काश्मीर, दिल्ली व हरियाणात नव्याने छापे घालण्यात आले. एनआयएतर्फे काश्मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मुमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. या छाप्यांमध्ये पाकिस्तानी चलनातील काही हजार रुपये तसेच संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया या देशांची चलने जप्त करण्यात आली आहेत.

देशांतर्गत असलेल्या फुटीरतावाद्यांकडून दहशतवाद्यांना होत असलेला पैशाचा पुरवठा नष्ट करण्यासाठी एनआयएला मोठे यश मिळाले आहे. गेल्या दोन दिवसापासून एनआयएने केलेल्या छापेमारीत ४० लाख रुपयांचे सोने, जमिनिंची कागदपत्रे एनआयएच्या हाती लागले आहेत. 

एनआयएने हर्रीयात पक्षाचे प्रवक्ते अयाज अकबर यांच्या श्रीनगर येथील घरावर छापा टाकला. अकबर यांच्या सर्व आर्थिक व्यवहार तसेच विदेश दौरे आणि तेथे झालेल्या व्यवहारांची चौकशी केली जात आहे. तसेच काही नेत्यांना या संबंधी नोटीसा देखील पाठवल्या आहेत. एनआयएकडून फुटीरतावादी नेत्याभोवती आपले पाश आणखी आवळायला सुरुवात केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून होणाऱ्या व्यापारातील घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या एका व्यापाऱ्याच्या जम्मूतील घरावर तसेच गोदामावरही छापे घालण्यात आले. काश्मिरातील उरी आणि जम्मूतील चकन-दा-बाद येथील सीमेवरून होणारा व्यापार वस्तू विनिमयावर आधारित असल्याने काही व्यापारी याबाबतची बिले कमी वा अधिक रकमेची दाखवून त्यातील तफावतीची रक्कम ही काश्मीर खोऱ्यात विघातक कारवायांसाठी पुरवत आहेत, दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळा!

गिलानी व असिया अन्द्राबी या नेत्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी ‘आयएसआय’ने 800 कोटी रुपये दिल्याचा आरोप ‘वन इंडिया न्यूज’ केला आहे. 
काश्मिरातील दहशतवाद घडविणार्याच्या आर्थिक नाड्या आवळणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना कोणकोणत्या मार्गांनी किती पैसा मिळतो आणि त्यांचे अर्थकारण कसे चालते, याची आकडेवारी उपलब्ध आहे. हे आर्थिक स्रोत रोखण्यात यश आल्यास निम्मी लढाई जिंकल्यासारखेच आहे.या लेखात आपण दहशतवादी अर्थपुरवठा कसा होतो, त्याची गरज काय आणि तो आपल्याला कसा थांबवता येईल यावर विचार करु.

जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाला प्रत्येक वर्षी पाकिस्तान तीनशे ते चारशे कोटी रुपयांची मदत करत असावा. ही मदत दहशतवादी, हुर्रियत कॉन्फरन्स, त्यांना मदत करणारे विविध साथीदार यांना केली जाते. मात्र, या दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी भारताचा होणारा खर्च याच्या चौपट आहे. म्हणजे पाकिस्तानला हा दहशतवाद पसरवण्यासाठी कमी आर्थिक झळ लागते. दहशतवादामुळे पाकिस्तान भारताचे जितके नुकसान करू शकतो आहे, ते भूतकाळातील युद्धांतही झालेले नव्हते.  पाकिस्तान भारताची कुरातप काढण्यासाठी दहशतवादी कृत्यांत आणखी वाढ करू शकतो. 

आर्थिक निकड व त्यांच्या पैशांचे स्रोत?

दहशतवाद पोटावरच चालतो. लढणार्या दहशतवाद्यांना प्रतिमहिना पंधरा हजार रुपये पगार , दहशतवाद्यांना मदत करण्यार्याना प्रतिमहिना चार ते पाच हजार पगार दिला जातो.  दहशतवाद्यांना मदत करणार्याची संख्या हजारो मध्ये आहे. याशिवाय शस्त्रे विकत घेणे, दारुगोळा, बड्या नेत्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च, विचारांचा प्रसार व प्रसिद्धीकरिता साहित्यावर होणारा खर्च, दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये वकिलांना दिले जाणारे पैसे, वाहनांचा खर्च अनेक खर्च करावे लागतात. 
दहशतवाद्यांना वेगवेगळ्या मार्गाने निधी उपलब्ध होतो. जंगलसंपत्तीचा चोरटा व्यापार, उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून वसूल केली जाणारी खंडणी हे त्यांच्या पैशांचे स्रोत आहेत.दहशतवादाकरिता २५ टक्के पैसे पाकिस्तानमधून, १५ टक्के पैसे अंमली पदार्थांच्या व्यापारातून, दहा टक्के अनधिकृत शस्त्रास्त्रविक्रीतून, १० टक्के खोट्या नोटांच्या व्यापारातून, १० टक्के मिळणाऱ्या देणग्यांतून, वीस टक्के, आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटना, सौदी अरेबियासारख्या इस्लामिक देशांकडून व दहा टक्के लुटालूट, दरोडखोरी यातून अशा प्रकारे पैसे गोळा केले जात असावेत. 

दहशतवाद्यांना यशस्वी कारवाईसाठी दोन ते अडीच लाख एवढी मोठी रक्कम दिली जाते. उच्च नेतृत्वाला अर्थातच जास्त पगार दिला जातो. दहशतवादी प्रशिक्षणाकरीता,शस्त्र आणि इतर काही कामांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. तसेच दहशतवाद्याचा मृत्यू झाल्यास पाच ते सहा लाख रुपये त्याच्या कुटुंबीयांना दिले जातात. दहशतवाद्यांच्या बड्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबांना वीस ते तीस हजार मासिक निवृत्तीवेतन दिले जाते. तरुणांना प्रोत्साहन देण्यसाठी पाकिस्तानी हस्तकांना पाच ते दहा हजार रुपये दिले जातात. 

दहशतवादी कशा पैसा गोळा करतात 

वृत्तवाहिनीवर जे स्टिंग ऑपरेशन दाखवले गेले, त्यात नेते कशा प्रकारे पैसा गोळा करतात याची माहिती लोकांसमोर मांडली गेली. हे पैसे दहशतवादी हस्तकाच्या घरात साठवून ठेवले जातात आणि गरज पडेल तसा पैशांचा वापर केला जातो. काही वेळा हे पैसे आपल्या हस्तकांच्या बँकेच्या खात्यात ठेवले जातात. अनेकदा इतक्या मोठ्या प्रमाणात रोख पैसे जवळ बाळगता न आल्याने विविध उद्योगांमध्ये ते आपले पैसे गुंतवू शकतात. म्हणजेच दहशतवादी यांचे पैसे विविध रूपांत असू शकतात. त्यात सोन्याचाही समावेश आहे. 

दहशतवादी समर्थकांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा

दहशतवादी करत असलेल्या बेकायदा कारवाया थांबवल्या, तर त्यांच्या खंडणीराजवर परिणाम होईल. दहशतवाद्यांचे हस्तकांची बँक खाती आणि इतर आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले पाहिजे. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादामुळे हुर्रियतच्या नेत्यांनी प्रचंड माया जमविली आहे. सध्या काश्मीर खोर्यातील दहशतवाद हा पैसा कमावण्याचा प्रचंड मोठा उद्योग बनला आहे. म्हणून त्यांचा,हवालाचा बिमोड झाला पाहिजे. 

अनेक परदेशी संस्थांकडून , त्यांना आर्थिक मदत दिली जाते. अशा संस्थांवर लक्ष ठेवावे लागेल. मदत मिळते. थोडक्यात, बिमोड करण्यासाठी त्यांच्या आर्थिक संरचनेवर घाला घालणे, हाच पर्याय आहे. दहशतवादी यांना विविध स्रोतांमधून पैसा मिळतो. त्यावर लक्ष ठेवावे लागेल. गुप्तहेर खात्याची कार्यक्षमता वाढवून हे सर्व रोखणे गरजेचे आहे, जेणेकरून दहशतवाद्यांना मिळणार्या पैशांत घट होईल आणि त्यामुळे दहशतवाद थांबवता येईल. यावेळी ठोस कारवाई करण्यासाठी पावले उचलली, जातील अशी आशा आहे.