कोलकत्ता : श्रीलंकेला कसोटी सिरीजमध्ये ३-० अशी मात केल्यानंतर भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीने सांगितले की, भारतीय टीमची कामगिरी एकदिवसीय सामन्यात देखील उत्तम राहील. शमीने तीन मॅचच्या सिरीज मध्ये एकूण १० विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट घेणारा शमी हा भारताचा तेज गोलंदाज ठरला.
शमीने सांगितले की, "अशाप्रकारची दुर्मिळ सिरीज जिंकणे ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही जिंकण्याची ही परंपरा कायम ठेऊ आणि अधिक चांगले खेळू. हाच टीमचा प्रयत्न आहे. आम्ही नेहमी एकत्रितपणेच खेळतो. आमचा एक परिवार आहे आणि आम्ही एकमेकांच्या यशात आनंद मानतो."
ही सिरीज जिंकल्यानंतर भारताने आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या टेस्ट टीम रँकिंगमध्ये स्थान अधिक मजबूत केले आहे. भारताचा संघ सध्या आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये सध्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा १५ अंक अधिक मिळवून प्रथम स्थानावर आहे. शमीने सांगितले की, "आमच्यात समजुदारपणा विकसित झाला आहे. आम्हाला एकमेकांच्या क्षमतेचा अंदाज आहे."
नवीन आलेले कोच रवी शास्त्रीबद्दल बोलताना शमी म्हणाला, "मी आधीच सांगितले आहे की सध्याची टीम आणि सपोर्ट स्टाफ सर्वश्रेष्ठ आहे." भारताचा टीमचा आगामी वेळापत्रक अधिक व्यस्त असल्याने सध्या वन डे सामन्यात शमीला विश्रांती दिली आहे.