Virat Kohli | विराट कोहलीला कसा वाटला '83' ; रणवीरच्या भूमिकेबद्दल काय म्हणाला? वाचा

टीम इंडियाच्या (Team India) 1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर (World Cup 1983)  आधारित सिनेमा '83' (83) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Updated: Dec 25, 2021, 05:01 PM IST
Virat Kohli | विराट कोहलीला कसा वाटला '83' ; रणवीरच्या भूमिकेबद्दल काय म्हणाला? वाचा title=

मुंबई : टीम इंडियाच्या 1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर (World Cup 1983)  आधारित सिनेमा '83' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा शुक्रवारी 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला. रणवीर सिंह (Ranveer Singh) हा '83' या सिनेमाला मुख्य भूमिकेत आहे. रणवीरने या सिनेमात 1983 च्या वर्ल्ड कपच्या विजयाचे हिरो ठरलेले कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकरली आहे. (Team India Test Captain virat kohli Give Reaction On world cup 1983 Historical Winning Base movie 83 and Ranveer Singh Acting of kapil dev role) 

या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरुन प्रतिसाद मिळतोय. टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीने हा सिनेमा पाहिला. त्याला हा सिनेमा कसा वाटला, तसेच रणवीरच्या भूमिकेबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

विराट काय म्हणाला?  

विराट स्वत:ला सिनेमा पाहिल्यानंतर व्यक्त होण्यापासून रोखू शकला नाही. त्याला या सिनेमाबाबत काय वाटलं, हे त्याने ट्विटद्वारे व्यक्त केलं आहे. 

"भारतीय क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक क्षण यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने अनुभवता आला नसता. अप्रतिम असा सिनेमा आहे, जो तुम्हाला 1983 चे वर्ल्ड कपचे क्षण पाहून भावूक होण्यास भाग पाडतो", अशा शब्दात विराटने या सिनेमाबाबत आपल्या भावना मांडल्या. 

रणवीरचं कौतुक
 
विराटने रणवीरने साकरलेल्या कपिल देव यांच्या भूमिकेचं कौतुक केलं. "रणवीरने अप्रतिम भूमिका साकारली. तसेच सर्वांनी चोखपणे भूमिका साकरली", असंही विराट  म्हणाला.       

बॉक्स आफिसवर पहिल्या दिवशी जोरदार 'बॅटिंग'

83 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीच जोरदार ओपनिंग केली. पहिल्याच दिवशी 83 या सिनेमाने 13 ते 14 कोटी दरम्यानचा गल्ला जमवला. येत्या काही दिवसात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करेल, अशा आशा व्यक्त केली जात आहे.