नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज दुपारी १.३० वाजता सुरु झाला आहे. हा सामना वीसीए स्टेडिअम, जामठा येथे खेळला जात आहे. आजपर्यंत जामठा येथे भारतीय संघाने ५ सामने खेळले आहेत. तसेच भारतीय संघाने या मैदानात एकही सामना गमवला नाही. हे मैदान भारतीय संघासबोत कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला देखील यश मिळाले आहे. याआधी जामठा मैदानातील धोनीची कामगिरी पाहून ऑस्ट्रेलिया संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. धोनीला कशाप्रकारे रोखता येईल यावर ऑस्ट्रेलिया संघ अभ्यास करत आहेत.
१) नागपूरच्या या स्टेडिअमवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महेंद्र सिंह धोनी याच्या नावावर आहे. त्याने ५ सामन्यात १३४च्या सरासरीने २६८ धावा केल्या आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली २०९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२) सर्वाधिक शतक विक्रमाच्या बाबतीत महेंद्र सिंह धोनी पहिल्या स्थानावर आहे. त्याने या मैदानात २ शतक केले आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, शिखर धवन, जार्ज बेली, शेन वॉटसन, तिलकरत्ने दिलशान यांनी १ शतकाचे विक्रम केले आहेत.
३) व्हीसीए स्टेडिअमवर महेंद्र सिंह धोनी याने ५ षटकार मारल्याचा विक्रम केला आहे. या यादीत अव्वल स्थानावर रोहित शर्माने आहे. त्याने या मैदानात सर्वाधिक ८ षटकार लगावले आहेत. त्यानंतर ४ षटकाराच्या यादीत सुरेश रैना, शेन वॉटसन यांचा समावेश आहे.