जेव्हा कोहली आणि मानुषी आले एकमेकांसमोर

जर सध्या भारताच्या दोन सर्वात प्रसिद्ध यंगस्टरबद्दल तुम्हाला विचारलं तर सर्वात आधी तुम्ही २ नावं घ्याल. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरी सध्या चर्चेत असलेली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 1, 2017, 10:10 AM IST
जेव्हा कोहली आणि मानुषी आले एकमेकांसमोर title=

मुंबई : जर सध्या भारताच्या दोन सर्वात प्रसिद्ध यंगस्टरबद्दल तुम्हाला विचारलं तर सर्वात आधी तुम्ही २ नावं घ्याल. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरी सध्या चर्चेत असलेली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर.

सर्वात चर्चेत असणारे यंगस्टर

जगाला या दोघांची वेगळी ओळख करुन देण्याची वेगळी गरज नाही. हे दोन व्यक्ती सध्या भारतात सर्वात चर्चेत आहेत. पण जेव्हा हे दोघे एकाच ठिकाणी एकमेकांसमोर आलेत हे पाहून दोघांच्या चाहत्यांना आनंद झाला असेल. दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा अनेकांना आहे.

 

you have made the country proud and represented the Women of today." - Virat Kohli . Follow-@virat.kohli18_fanclub

A post shared by Virat Kohli (@virat.kohli18_fanclub) on

एकमेकांना भेटून झाला आनंद

दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. त्या दोघांना स्टेजवर एकत्र बोलावले गेले. दोघांनी एकमेकांना शेकहँड केला. दोघांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. दोघांना देखील एकमेकांना भेटून आनंद झालेला दिसत होता.

 

Good morning everyone!. Follow-@virat.kohli18_fanclub

A post shared by Virat Kohli (@virat.kohli18_fanclub) on

जगभरात सध्या यांचीच चर्चा

दोघं एकत्र येताच टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत झालं. विराट कोहली सध्या क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतो आहे. अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. तर दुसरीकडे मानुषीने देखील ११८ देशांच्या सुंदरींना मागे टाकून विश्वसुंदरी बनवण्याचा मान पटकावला आहे. १७ वर्षानंतर भारताला याचा मान मिळाला.