नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
१०वी पास तरुणांना रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इस्टर्न रेल्वेने ८६३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया अॅप्रेन्टिस पदांसाठी असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
८६३ अॅप्रेन्टिस पदांसाठी १०वी पास तरुण अर्ज करु शकतात.
अॅप्रेन्टिस (वेल्डर, फिटर, कारपेंटर आणि वायरमन या पदांचा समावेश आहे)
८६३
इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतुन ५० टक्के मार्क्ससोबत १०वी पास असावा. यासोबतच आरटीआय प्रमाणपत्रही अनिवार्य आहे.
१ जुलै २०१७ पर्यंत इच्छुक उमेदवाराचं कमीत कमी वय १५ वर्ष आणि अधिक वय २४ वर्ष असावं.
सर्वसाधारण आणि इतर मागास वर्गीय उमेदवारांना १०० रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. महिला, एससी, एससी प्रवर्गातील उमेदवारांना कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाहीये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या तारखेपर्यंत आपला अर्ज सादर करु शकतात.
इच्छुक उमेदवार इस्टर्न रेल्वेच्या www.er.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवरुन आपला अर्ज सादर करु शकतात.