पॉकेट मनी बचतीचे सोपे मार्ग!

तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा नवीन जॉब असेल तरी बचत करणे गरजेचे आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 23, 2018, 08:45 PM IST
पॉकेट मनी बचतीचे सोपे मार्ग! title=

नवी दिल्ली : तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा नवीन जॉब असेल तरी बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही खर्च आटोक्यात आणून बचत करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

बजेट बनवा 

बचतीचा पहिला नियम हा आहे की बजेट बनवा. बजेट बनवताना वर्कशीटवर दोन सेक्शन बनवा. एकात अत्यंत महत्त्वाच्या आणि एकात फारसे महत्त्वाचे नसलेले खर्च लिहा. सर्वात आधी जे जरुरी आहे ते काम पूर्ण करा. नंतर इतर गोष्टींकडे लक्ष द्या.

विनाकारण होणारे खर्च टाळा

काही गोष्टी घेण्याची इच्छा खूप असते मात्र त्या फारशा गरजेच्या नसतात. म्हणजे त्या खरेदी न केल्यास काही फरक पडणार नाही. अशा खर्चांपासून दूर रहा.

40 % बचत करा

तुमच्या पगारातील 40 % तुम्ही काही केल्या बचत करणे गरजेचे आहे. जर तुमच्याने हे शक्य नसेल तर असे काहीतरी करा की ज्यामुळे तुमच्या पगारातून 40 % रक्कम आपोआप कट होऊन सेव्ह होईल.

लहान सहान बचत

ज्या ठिकाणी शेअरिंग ऑटो, मेट्रो, बसने जाऊ शकता त्या ठिकाणी पर्सनल कॅब बुक करुन जाणे टाळा. ऑफिसमध्ये नेहमी बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा घराचे अन्न खाणे हेल्दी तर ठरेलच पण बचतही होईल. अशा सवयींमुळे तुम्ही काही रक्कम नक्कीच सेव्ह करू शकता.