सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.

Sunil Desale Updated: Mar 29, 2018, 11:52 PM IST
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती title=

नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये एकूण २५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी आणि किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

पद आणि पदांची संख्या : 

डिप्लोमा टेक्नीशिअन (मेकॅनिकल) - २ जागा

बीएएमईसी (मेकॅनिकल) - १ जागा

टेक्नीशिअन - २२ जागा 

· टेक्नीशिअन इलेक्ट्रोप्लेटर - २ जागा

· टेक्नीशिअन (सीएनसी मशीनिस्ट) - ४ जागा

· टेक्नीशिअन (पेंटर) - ४ जागा

· टेक्नीशिअन (फिटर) - ७ जागा

· टेक्नीशिअन (हीट ट्रीट ऑपरेटर) - ४ जागा

· टेक्नीशिअन (वेल्डर) - १ जागा

शैक्षणिक पात्रता : 

डिप्लोमा टेक्नीशिअन (मेकॅनिकल) - मेकॅनिकल डिप्लोमा

बीएएमईसी (मेकॅनिकल) - बेसिक विमानाचे देखभाल इंजिनियर प्रमाणपत्र

टेक्नीशिअन - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आणि एनएसी आवश्यक

वयोमर्यादा : 

१ मे २०१८ रोजी 28 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

१ मे २०१८

या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://halcareer.in/HAL2018HELICOPTER/Adv-Eng.pdf या संकेतस्थळावर पहायला मिळेल.

अर्ज करण्यासाठी http://halcareer.in/HAL2018HELICOPTER/ या लिंकवर क्लिक करा.