बापरे! वय फक्त १६ वर्ष आणि पगार १२ लाख रुपये प्रति महिना

१६ वर्षाच्या एका विद्यार्थ्याला इंटरनेट जायंट गूगलने आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. हर्ष‍ित शर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. हर्ष‍ितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून 12वीची परिक्षा दिली आणि ऑगस्टमध्ये तो आता अमेरिकेला जाणार आहे. 

Updated: Jul 31, 2017, 06:59 PM IST
बापरे! वय फक्त १६ वर्ष आणि पगार १२ लाख रुपये प्रति महिना title=

चंडीगड : १६ वर्षाच्या एका विद्यार्थ्याला इंटरनेट जायंट गूगलने आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. हर्ष‍ित शर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. हर्ष‍ितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून 12वीची परिक्षा दिली आणि ऑगस्टमध्ये तो आता अमेरिकेला जाणार आहे. 

गूगलच्या या स्पेशल प्रोग्रामसाठी हर्ष‍ित एक वर्षाची ट्रेनिंग दिली जाणार आहे. यासाठी त्याला ४ लाख रुपये पगार दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होताच हर्ष‍ितचा पगार १२ लाख रुपये प्रति महिना होणार आहे.

गूगलने हर्ष‍ितला ऑगस्टमध्ये ज्वॉइन करण्यास सांगितलं आहे. हर्ष‍ितने म्हटलं की, मी ऑनलाइन जॉब सर्च करत होतो. मी या जॉबसाठी मे मध्ये अप्लाय केलं होतं आणि ऑनलाईन मुलाखत देखील दिली होती. मागील १० वर्षांपासून मला ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये आवड होती. मी जे पोस्टर डिझाईन केलं त्यावरच मला ही संधी मिळाली.

हर्ष‍ितचे माता-पिता हे शिक्षक आहेत. लहान भाऊ १० वी मध्ये आहे. हर्ष‍ित शिक्षणासाठी त्याच्या काकांकडे राहतो. हर्ष‍ितला प्रधानमंत्री डिजिटल इंडिया स्कीमच्या अंतर्गत ७००० रुपयांचं बक्षिस देखील मिळालं आहे.