पालकांनो लक्ष द्या, दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 29, 2017, 04:09 PM IST
पालकांनो लक्ष द्या, दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर title=

मुंबई : २०१८ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेय. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. 

या तारखेला होणार परीक्षा

दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृतपणे जाहीर केलेय.  दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर झाल्याने नाराजी व्यक्त होत होती.

बारावीची नियमित, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या दरम्यान होणार आहे. त्याआधी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेय.

येथे पाहा वेळापत्रक

दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. 

मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या

दरम्यान, सोशल मीडियावर दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेय, ते पाहावे, असे आवाहन करण्यात आलेय.