सीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी

सीबीएसईच्या १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी रक्षा गोपालने ९९.६ टक्के गुण मिळवत देशात पहिली आली आहे. रक्षा अमिटी इंटरनेशनल स्कूल, नोएडाची विद्यार्थिनी आहे. 

Updated: May 28, 2017, 12:54 PM IST
सीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी

नवी दिल्ली : सीबीएसईच्या १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी रक्षा गोपालने ९९.६ टक्के गुण मिळवत देशात पहिली आली आहे. रक्षा अमिटी इंटरनेशनल स्कूल, नोएडाची विद्यार्थिनी आहे. 

रक्षानंतर भूमी सावंत हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. चंदीगडच्या भूमीने ९९.४ टक्के गुण मिळवले आहेत.

आदित्‍य जैन आणि मन्‍नत लूथरा यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत. चंदीगडच्या भवन विद्या मंदिरच्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९९.२ टक्के गुण मिळवले आहेत.

यावर्षी 10,98,891 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यामध्ये 4,60,026 मुली आणि 6,38,865 मुले होते.