चहा विकणाऱ्याच्या मुलीला अमेरिकेतून ३.८ कोटींची स्कॉलरशीप

शिक्षणच नाही तर अमेरिकेत जाण्याचे आपले स्वप्नही पूर्ण केले

Updated: Jun 18, 2018, 01:28 PM IST
चहा विकणाऱ्याच्या मुलीला अमेरिकेतून ३.८ कोटींची स्कॉलरशीप title=

बुलंदशहर : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या सुदीक्षा भाटीला अमेरिकेतील प्रतिष्ठित बॉबसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप मिळाली आहे. १२ मध्ये सीबीएसई मध्ये ९८ टक्के गुण मिळवून ती जिल्ह्यातून पहिली आली. अत्यंत गरीबीतून आलेल्या सुदीक्षाचे वडिल चहा विकून परिवार संभाळतात. आर्थिक स्थिती आणि लादलेल्या सामाजिक रुढी तोडत सुदीक्षाने केवळ आपले शिक्षणच नाही तर अमेरिकेत जाण्याचे आपले स्वप्नही पूर्ण केले आहे.

शिक्षणाला प्रोत्साहन 

अमेरिकेच्या बॉबसन कॉलेजने सुदीक्षाला ४ वर्षाच्या कोर्ससाठी ३.८ कोटी स्कॉलरशिप दिली आहे. माझ शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न इतकं सोपं नव्हतं. २०११ मध्ये मला लीडरशिप अॅकेडमी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आणि यानंतर शिक्षण सुरू ठेवणं सोपं झालं. याठिकाणी वंचित समुदायातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते. सुरूवातीला माझा परिवार आणि पालकांनाा शिक्षण सुरू ठेवणं हे त्रासदायक वाटत होत पण त्यांनतर त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहीत केलं.