close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अनुष्का शेट्टी नव्हे 'या' अभिनेत्रींशी जुळली प्रभासची केमेस्ट्री

अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि बाहुबलीच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.

Updated: Aug 19, 2019, 12:18 PM IST
अनुष्का शेट्टी नव्हे 'या' अभिनेत्रींशी जुळली प्रभासची केमेस्ट्री

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार 'बाहुबली' प्रभासच्या चर्चा चांगल्याच जोर धरत आहे. त्याचा बहुप्रतिक्षीत 'साहो' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलरला चाहत्यांकडून कमालीची दाद मिळत आहे. अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि बाहुबलीच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आसताना, प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरची ऑनस्क्रिन केमेस्ट्री गाजताना दिसत आहे. नुकताच 'साहो' चित्रपटाचा आणखी एक पोस्टर रीलिज करण्यात आला आहे.

खुद्द प्रभासने चित्रपटाचे नवीन पोस्टर त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले. यामध्ये दोघांमध्ये असणारी ऑनस्क्रिन केमेस्ट्री चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवताना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रभास अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत थिरकताना दिसणार आहे. गायक बादशाह आणि गायिका निती मोहनच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेल्या 'बॅड बॉय' गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.   

'साहो' चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. 'साहो'तील सायको सय्या आणि इन्नी सोनी ही दोन गाणीही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. जवळपास १५० कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ यांनी केले आहे.

'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.