close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

....अन् फोटोग्राफरच्याच प्रेमात पडले मलायका- अर्जुन

 कोणी टीपले आहेत त्यांचे हे फोटो ? 

Updated: Aug 19, 2019, 11:43 AM IST
....अन् फोटोग्राफरच्याच प्रेमात पडले मलायका- अर्जुन
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बी- टाऊनमध्ये सध्याच्या घडीला अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यालाही अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. अशा सेलिब्रिटींच्या गर्दीत प्रकाशझोतात असणारी एक जोडी म्हणजे, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. 
प्रेमाच्या नात्याला वयाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं हेच या दोघांनी सिद्ध केलं. आहे.

मुख्य म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जोडी त्यांच्या प्रेमाची 'खुल्लम खुल्ला' ग्वाही देत आहेत. अशातच सध्या या नात्याने लक्ष वेधलं आहे ते म्हणजे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या त्यांच्या फोटोंमुळे. 

width: 640px; height: 1048px;

अर्जुनने शेअर केलेल्या फोटोवर मलायकाची कमेंट आणि खुद्द अर्जुनने लिहिलेलं कॅप्शन पाहता तो फोटोग्राफरवर भाळल्याचंच लक्षात येत आहे. फक्त अर्जुनच नव्हे तर, मलायकानेही तिचा एक सुरेख असा फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोवर कमेंट करत, छायाचित्रकाराचा चांगलंच कौशल्य अवगत आहे; अशी प्रतिक्रिया दिली. ज्याला मलायकानेही दुजोरा दिला. मुख्य म्हणजे एकमेकांचे सुरेख फोटो काढत काही खास क्षणांना कॅमेऱ्याच्या नजरेत टीपणाऱ्या मलायका आणि अर्जुनने थेट शब्दांमध्ये एकमेकांना छाया सौजन्य अर्थात फोटो क्रेडिट दिलेलं नाही. 

width: 640px; height: 593px;

width: 640px; height: 1091px;

width: 640px; height: 648px;

असं असलं एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत आपणत काढलेल्या अमुक एका छायाचित्राची प्रशंसा करण्याता त्यांचा हा विनोदी आणि तितकाच प्रेमळ अंदाज चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.  #WorldPhotographyDay च्या दिवसाच्या निमित्ताने 'अदृश्य' छायाचित्रकाराच्या प्रेमात पडलेल्या या सेलिब्रिटी जोडीची बात काही औरच.