तिहार जेलमध्ये 'या 'महाठगाला भेटायला यायच्या 10 प्रसिद्ध अभिनेत्री? सत्य अखेर समोर

अभिनेत्रींना प्रेमाच्या जाळात अडकवायचा आणि...   

Updated: Dec 17, 2021, 04:46 PM IST
तिहार जेलमध्ये 'या 'महाठगाला भेटायला यायच्या 10 प्रसिद्ध अभिनेत्री? सत्य अखेर समोर  title=

मुंबई : महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सुकेश चंद्रशेखर 200 कोटींच्या फसवणुकीतील मुख्य आरोपी आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. आता या प्रकरणात सिनेविश्वाशी निगडीत आणखी काही नावं समोर येऊ शकतात असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण प्रकरणात अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात एक मोठे आणि आलिशान कार्यालय चालवत होता, जिथे त्याला सर्व प्रकारच्या सुविधा मिळत होत्या. इतकेच नाही तर सुकेश कारागृहात आलिशान चिकन पार्ट्याही करायच, असं देखील समोर येत आहे.

त्याच्या मैत्रिणी देखील या पार्ट्यांमध्ये उपस्थित असायच्या. महाठग सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी 10 पेक्षा जास्त सुपरमॉडेल्स आणि अभिनेत्री तुरुंगात येत होत्या. अभिनेत्री लीना मारिया पॉलने आपल्या म्हटले आहे की, जेलमधील त्याच्या कार्यालयात सोफा, फ्रीज, टीव्ही यांसारख्या सुविधा होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, लीनाला तुरुंगात जाण्यासाठी परवानगी होती. त्याच्या कार्यालयात मिनरल वॉटरच्या बाटल्याही होत्या. जॅकलिन फर्नांडीज आणि नोरा फतेही व्यतिरिक्त जवळपास 10 सुपरमॉडेल्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी तिहार जेलमध्ये जात होत्या. पण अद्याप दोघांनी याप्रकरणी मौन बाळगलं आहे.