चाहत्यासाठी काय पण... गुरु रंधावाच्या चाहतीने चक्क त्याच्यासाठी सोडलं घर

मुलं आणि मुली कायम तेव्हाच घरातून पळून जातात. जेव्हा मुलांच्या घरचे त्यांच्या विरोधात असातत.

Updated: Jun 25, 2021, 06:13 PM IST
चाहत्यासाठी काय पण... गुरु रंधावाच्या चाहतीने चक्क त्याच्यासाठी सोडलं घर title=

मुंबई : मुलं आणि मुली कायम तेव्हाच घरातून पळून जातात. जेव्हा मुलांच्या घरचे त्यांच्या विरोधात असातत. मात्र हिमाचलच्या हमीरपूरमधील फरार मुलीची एक वेगळी घटना चर्चेत आली आहे. एका वृत्तानुसार लग्नाच्या पंधरा दिवस आधी ही मुलगी घरातून रोकड व दागिने घेऊन पळून गेली. हे प्रकरण पोलिसांसह डीसी हमीरपूरपर्यंतही पोहोचलं आहे. आत्तापर्यंत मुलीचा कोणताही क्लू सापडला नाही. गुरु रंधावा नावाच्या युवकाने मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलीने पन्नास हजाराहून अधिक किंमतीची रोकड व दागिने आपल्यासोबत घेवून गेल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीचं लग्न निश्चित झालं होतं आणि मुलगी लग्नाबद्दल खूप खुश असल्याचंही त्यांनी सांगितलं. याचबरोबर वडिलांनी हे देखील सांगितलं की, काही लोकांनी तिला जाताना पाहिलं होतं. यावेळी त्या मुलीकडे तीन ते चार बॅग होत्या. त्यानंतर तिची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली.

या प्रकरणात, एक गमतीशीर ट्विस्ट समोर आला आहे. जेव्हा समजलं की, हरवलेली मुलगी पंजाबी गायक गुरु रंधावाची सर्वात मोठी फॅन आहे. ट्विटरवरही या मुलीने पंजाबी गायक गुरु रंधावाचे ट्विट पुन्हा ट्विट केलं. मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, ट्विटर अकाऊंटवरून तिची एका मुलाबरोबर ओळखल झाली, जो स्वत:ला गुरु रंधावाचा खास म्हणवतो. अशा परिस्थितीत मुलगी त्याच युवकाला भेटण्यासाठी पळून गेली असल्याचा संशय कुटुंबियांचा आहे. सध्या या प्रकरणात स्पष्टपणे काहीही सांगितलं जात नाही, मात्र या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

त्यामुळे या प्रकरणी कारवाई करत असताना पोलिसांनी मुलीच्या ट्विटर अकाऊंटची कसून तपासणीही केली. दुसरीकडे, अप्पर पोलिस अधीक्षक हमीरपूर विजय सकलानी यांचं म्हणणे आहे की, पोलिस त्यांच्या वतीने याप्रकरणी योग्य ती कारवाई करीत आहेत. घर सोडण्यापूर्वी मुलीने एक पत्र लिहिलं आहे ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की, ती घर सोडत आहे. हे पत्र मिळाल्यानंतर शनिवारी त्याची तक्रार बार्सर पोलिस ठाण्यात देण्यात आली. सध्या ही बाब देशभर चर्चेचा विषय ठरत आहे, परंतु अद्याप अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.