2.0 सिनेमाची 13 दिवसांची कमाई

पाहा आतापर्यंतची कमाई 

2.0 सिनेमाची 13 दिवसांची कमाई title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 या सिनेमाने उत्तम ओपनिंग केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 2 आठवडे झाले. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळत आहे. 

13 दिवसांनी या सिनेमाची गती थोडी कमी झाल्यासारखी वाटत आहे. 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. सायन्स फिक्शनवर आधारित असलेल्या या सिनेमाला सर्वच स्तरातील मंडळी पसंत करत आहेत. 

2.0 ने शुक्रवारच्या अपेक्षेपेक्षा सोमवारी 35 टक्के कमी कमाई केली. सिनेमाने सोमवारी 3.75 करोड रुपयांची कमाई केली. तर हिंदी वर्जनने 30 करोड रुपयांची कमाई केली. दिवसेंदिवस कमाईत घट पाहायला मिळत आहे. 

तसेच पुढील आठवड्यात शाहरूख खानचा झिरो हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 2.0 सिनेमाने आतापर्यंत 167.50 करोड रुपयांची कमाई केली आहे. मंगळवारी हा आकडा 170-172 करोड रुपयांपर्यंत पोहोचेल.  

ट्रेड अॅनालिस्ट यांच्या माहितीनुसार जगभरात या सिनेमाने 650 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाचं बजेट 600 करोड रुपयांच असून यावर्षी रिलीज झालेल्या पद्मावत सिनेमाने 585 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. 

ट्रेड अॅनालिस्टनुसार, अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर हा तिसरा सिनेमा 5 मिलियन डॉलर म्हणजे 35.62 करोड रुपयांची कमाई केली आहे. या अगोदर पद्मावत आणि संजू सिनेमाने अशी कमाई केली आहे. 

2.0 तेलुगु, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये 6800 स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. 2010 मध्ये आलेल्या रोबोटचा हा सिक्वल ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन देखील होती.