मुंबई : डॉन सिनेमाला 42 वर्षे पूर्ण: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट सिनेमा डॉनच्या नावाबद्दल डिस्ट्रीब्यूटर्स बरेच नाराज होते. चित्रपटाच्या निर्मितीनंतर नावामुळे हा सिनेमा प्रदर्शित होणं फार कठीण झालं. अमिताभ बच्चन यांना डॉन सिनेमाला 42 वर्ष पूर्ण झाल्यावर चित्रपटादरम्यान काही कहाण्या आठवल्या. जाणून घ्या बिगबींने सोशल मीडियावर काय लिहिलं आहे
बिग बींना आठवतायेत चित्रपटातील किस्से
1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डॉन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला होता. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी निर्मात्यांना खूप संघर्ष करावा लागला. चित्रपटाच्या प्रदर्शनाला 42वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाशी संबंधित किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिनेमाच्या नावाला सहमत नव्हते डिस्ट्रीब्यूटर्स
एका वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिलं होते की, डिस्ट्रीब्यूटर्स चित्रपटाच्या नावावर सहमत नव्हते. वास्तविक, त्यावेळेस डॉन नावाचं अंडरवेअर खूप लोकप्रिय झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, डिस्ट्रीब्यूटर्सना या नावामुळे चित्रपट चालवू नयेत अशी भीती वाटत होती. आणि डिस्ट्रीब्यूटर्सना तोटा सहन करायचा नव्हता. म्हणूनच नाव बदलण्याविषयी डिस्ट्रीब्यूटर्संनी निर्मात्यांशी चर्चा केली.
निर्मात्यांनी सिनेमाचं नाव बदललं नाही
त्याचवेळी 'द गॉडफादर' हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. जो गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डवर केंद्रित होता. चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. अमिताभचा 'डॉन' हा चित्रपटदेखील अंडरवर्ल्डच्या कथेशी मिळता-जुळता होता. दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा निर्धार होता की, हा चित्रपट पुढे जाईल. त्यामुळे चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं नाही.
चित्रपटाला मिळालं जबरदस्त यश
जेव्हा कोणताही बदल न करता हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांना तो खूप आवडला. हा चित्रपट जबरदस्त सुपरहिट असल्याचं सिद्ध झालं. चित्रपटाच्या गाण्यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. अमिताभ बच्चन यांनी डॉनमध्ये दुहेरी भूमिका केली होती. याशिवाय, झीनत अमान, हेलन, प्राण आणि इफ्तेखार हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत होते