शादी मे जरुर आना : हा सिनेमा पाहण्याची ५ कारणे

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांचा 'शादी मे जरुर आना' हा सिनेमा उद्या रिलीज होतोय. 

Updated: Nov 9, 2017, 10:13 PM IST
शादी मे जरुर आना : हा सिनेमा पाहण्याची ५ कारणे title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांचा 'शादी मे जरुर आना' हा सिनेमा उद्या रिलीज होतोय. 

राजकुमार रावचे यंदाच्या वर्षात ट्रॅप, बरेली की बर्फी आणि न्यूटन हे सिनेमे रिलीज झाले. न्यूटनमध्ये तर राजकुमार रावने कमालीचा अभिनय साकारली होता. समीक्षकांनीही या सिनेमाचै कौतुक केले होते. आता 'शादी मे जरुर आना 'या सिनेमातही राजकुमार वेगळ्या अवतारात दिसणार आहे.

१. या सिनेमात राजकुमार राव रोमान्स तसेच डान्स करताना दिसणार आहे. तसेच राजकुमार आणि कृती खरबंदा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतायत.  जाणून घ्या या सिनेमा पाहण्याची ५ कारणे

२. सिनेमाची कहाणी हे पहिले कारण आहे. प्रत्येक लव्हस्टोरीप्रमाणे या सिनेमात रोमान्स आहे, प्रेम आहे. मात्र त्यात एक ट्विस्ट आहे. 

३. सिनेमातील अभिनेत्री कृती खरबंदाने राज रिबूट सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती गेस्ट इन लंडनमध्ये दिसली होती. या सिनेमातही तिच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. 

४. राजकुमार रावने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे या सिनेमात राजकुमारचा वावर कसा असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

५. सिनेमातील गाण्यांना जुन्या काळाचा रोमँटिक टच आहे. जो अनेकांना आवडेल. या गाण्यांना आनंद राज आनंद यांनी संगीत दिलेय.सिनेमातील काही डायलॉग्सही मजेदार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन रत्ना सिन्हाने केलंय.