८५ वर्षांच्या आजी अजय देवगनसोबत करताय सिनेमात डेब्यू

फिल्म इंड्स्ट्रीमध्ये कधी कोणाचं डेब्यू होईल हे सांगता येत नाही. आपल्यातली कला दाखवण्यासाठी कोणतंही वयाचं बंधन नसतं. त्यामुळे आता ८५ वर्षांच्या आजी सिनेमात डेब्यू करणार आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2018, 04:05 PM IST
८५ वर्षांच्या आजी अजय देवगनसोबत करताय सिनेमात डेब्यू title=

मुंबई : फिल्म इंड्स्ट्रीमध्ये कधी कोणाचं डेब्यू होईल हे सांगता येत नाही. आपल्यातली कला दाखवण्यासाठी कोणतंही वयाचं बंधन नसतं. त्यामुळे आता ८५ वर्षांच्या आजी सिनेमात डेब्यू करणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या राहणाऱ्या पुष्पा जोशी या अभिनेता अजय देवगनसोबत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत. पुष्पा जोशी या अजयच्या आगामी रेड या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत.

पुष्पा जोशी सिनेमामध्ये सौरभ शुक्लाच्या आईचा रोल करणार आहेत. त्या पहिल्यांदाच कॅमेरा फेस करणार आहेत. याआधी त्यांनी कधी अभिनय केलेला नाही. शूटींगच्या वेळेस मात्र त्या अगदी वेळेवर उपस्थित राहायच्या.

अजय देवगन याने देखील त्यांची खूप काळजी घेतली. रेडमध्ये अजय देवगन सोबत इलियाना डिक्रुज देखील काम करत आहे. हा सिनेमा राजकुमार गुप्ता यांनी डायरेक्ट केला आहे. १६ मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.