मुंबईतील एका चौकाला अभिनेता प्राण यांचं नाव

मुंबईतील एका चौकाला अभिनेता प्राण यांचं नाव

Updated: Aug 27, 2018, 01:15 PM IST
मुंबईतील एका चौकाला अभिनेता प्राण यांचं नाव title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता प्राण यांचं नाव मुंबईतील एका चौकाला देण्यात आलं आहे. बांद्रा येथील एका चौकाला 'पद्मभूषण प्राण चौक' असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी अनेक कलाकार उपस्थित होते.

प्राण यांचं सिनेसृष्टीला मोठं योगदान आहे. प्राण यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे. त्यांनी अभिनयाने अनेकाचं मन जिंकलं होतं. 

अभिनेता प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 ला दिल्लीमध्ये झाला होता. 12 जुलै 2013 ला त्यांचं मुंबईत निधन झालं.