close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'म्हाळसा' फेम सुरभी हांडेचा झाला साखरपुडा

कुणासोबत पार पडला साखरपुडा 

'म्हाळसा' फेम सुरभी हांडेचा झाला साखरपुडा

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'जय मल्हार'. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. या मालिकेतील म्हाळसा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी हांडे हिचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. सुरभीने अगदी गुपचूप हा साखरपुडा केला आहे.  

जळगाव येथे दुर्गेश कुलकर्णी याच्यासोबत सुरभीने साखरपुडा केला आहे. या सोहळ्याला अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. सुरभीने आपल्या साखरपुड्याची कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे अगदी साधेपद्धतीने हा सोहळा पार पडला आहे. सध्या सुरभीच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. सुरभीच्या साखरपुड्याचे फोटो देशील सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. 

सुरभीची 'जय मल्हार' ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली. सुरभीने यामध्ये म्हाळसा भूमिका साकारली होती. सुरभी हांडे ही मुळ जळगावची. बालपणापासूनच एकांकिका, नाट्यछटा, एकपात्री प्रयोग साकारण्याचा तिला छंद होता. कुटुंबात वडील संजय हांडे हे आकाशवाणीला अस‌िस्टंट म्युझ‌िक डायरेक्टर म्हणून, तर आई अंजली एम. जे. कॉलेजला संगीत विषयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सुरभीने ‘स्टॅण्ड बाय’ या हिंदी चित्रपटात आणि ‘आंबट गोड’ या मालिकेत तिने श्रध्दा हे निगेटिव्ह कॅरेक्टर साकारले होते. तसंच केदार शिंदे दिग्दर्शित अगंबाई अरेच्चा 2 या सिनेमातसुध्दा ती मह्त्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकली होती. सध्या सुरभीची लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे.