'हाऊसफुल ४'चा वाद संपेना; सेटवर गुंडांनी महिलेचे कपडे फाडले

या घटनेला प्रसिद्ध डान्सर रेमो जबाबदार?

Updated: Oct 26, 2018, 10:51 AM IST
'हाऊसफुल ४'चा वाद संपेना; सेटवर गुंडांनी महिलेचे कपडे फाडले

मुंबई : नाना पाटेकर आणि साजिद खान यांच्यावर Metoo मोहिमेअंतर्गत सोडाव्या लागलेल्या 'हाऊसफुल ४'च्या चित्रिकरणादरम्यान गुरुवारी मोठा राडा झाला. चित्रीकरणादरम्यान एका महिला को डान्सरला धक्काबुक्की करून तिचे कपडे फाडण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय.

गुरुवारी रात्री चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी रात्री चार गुंड सेटवर आले. आमीर नावाच्या एका डान्सरला जबरदस्ती बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. 

सोबतच्या महिला डान्सर्सनी या प्रकाराला विरोध केला. त्यावर गुंडांनी पीडित महिलेला धक्काबुक्की करून तिचे कपडे फाडले.

गुंडाच्या टोकळ्याचा प्रमुख पवन शेट्टी आहे. पवन शेट्टी आणि डान्सर आमिर यांचा जुना वाद असल्याचं पुढे आलंय.

घटनेच्या वेळी अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख सेटवर उपस्थित होते. या घटनेला प्रसिद्ध डान्सर रेमो जबाबदार असल्याचा आरोप सेटवरील डान्सर्सनी केलाय.