एँकर हिंदी भाषा बोलताचं ए आर रेहमानकडून ट्रोल; Video व्हायरल

एँकरने प्रमोशनदरम्यान हिंदी भाषा वापरल्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Updated: Mar 27, 2021, 09:13 AM IST
 एँकर हिंदी भाषा बोलताचं ए आर रेहमानकडून ट्रोल; Video व्हायरल  title=

मुंबई : ए आर रेहमान भारतीय  संगीत क्षेत्राला लाभलेले एक रत्न आहेत. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ए आर रेहमान सध्या त्याच्या आगामी '99' सिनेमाच्या गाण्यांमुळे चर्चेत आहे. सध्या सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे.  सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ए आर रेहमान देखील उपस्थिती दर्शवत आहेत. यावेळी एँकरने हिंदी भाषेचा वापर करताच त्यांनी अँकरला विनोदी अंदाजात ट्रोल केलं. यादरम्यानचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Surya (@suryasurya5073)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अँकर दिसत नाही. सर्वप्रथम अँकर  ए आर रेहमान यांना शुभेच्छा देते आणि त्यानंतर एहान भट्टचं मंचावर स्वागत करताना हिंदी भाषेचा वापर करते. ती म्हणते, 'एहान भट्ट चेन्नईमध्ये तुमचं स्वागत...' अँकरने हिंदी बोलताच ए आर रेहमान चकित होवून विचारतात हिंदी?.... रेहमान यांच्या या  प्रतिक्रियेवर जमलेल्यांना हसू आवरत नाही.

अँकरला विनोदी  अंदाजात ट्रोल  केल्यानंतर मंचा वरून खाली उतरून 'मस्करी करत होतो...' असं म्हणाले. त्यानंतर अँकर हसते आणि पुन्हा तामीळ भाषेत बोलायला सुरूवात करते.  सांगायचं झालं तर रेहमान  कायम सामाजिक, राजकीय मुद्द्यांपासून दूर राहतात.  तामिळनडूमध्ये हिंदी भाषेचा वापर फार कमी प्रमाणात होतो. येथील स्थानिक लोकं देखील हिंदी भाषेला विरोद करतात. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.