'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' सलमान खानसाठी या खास व्यक्तीने गायलं गाणं

आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी सलमान खान अबुधाबीला पोहोचला

Updated: Jun 5, 2022, 07:59 PM IST
'एक लड़की को देखा तो ऐसा लगा'  सलमान खानसाठी या खास व्यक्तीने गायलं गाणं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं लहान मुलांवर किती प्रेम आहे, हे कोणापासून लपून राहिलेलं नाही. सलमान खानचं मुलांवरचं प्रेम वेळोवेळी पाहायला मिळतं. सलमान आपल्या भावंडांच्या मुलांसोबत बराच वेळ घालवताना दिसतो.

अलीकडेच, आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी सलमान खान अबुधाबीला पोहोचला तेव्हा येथे तो छोट्या चाहत्यांना मिठी मारताना आणि त्यांच्यासोबत पोज देताना दिसला. यानंतर, सलमान खानचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान खूश होवून लहान मुलाला मिठी मारताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गोंडस लहान मूलगा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं अतिशय सुंदर आणि अतिशय गोंडस पद्धतीने गाताना दिसत आहे. ते पाहून केवळ सलमान खानच नाही तर त्याच्यासोबत उभे असलेले इतर लोकंही एका जाी उभे राहून आश्चर्यचकित दिसत आहेत.

गाणं पूर्ण म्हणून झाल्यानंतर या मुलानेही सलमान खानला शुभेच्छा दिल्या. यानंतर सलमानही गुडघे टेकून मुलाला मिठी मारतो आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. भाईजानकडून हे प्रेम मिळाल्याने मुलगाही खूप खूश दिसत आहे. यानंतर दोघांनीही कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोज दिली.  व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव अब्दू रोजिक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानने एका मुलाला प्रेमाने मिठी मारल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून चाहते त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यासोबतच अनेक चाहते या मुलाला 'छोटा भाईजान' म्हणत आहेत आणि त्याच्या गाण्याचं कौतुक करत आहेत. लक्षात घेण्यासारखं आहे की सलमान खान देखील आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये पोहोचला होता आणि येथे त्याने बाइक चालवत धमाकेदार एन्ट्री घेतली.