'आपल्या महाराष्ट्राला आहे 'हा' शाप...', प्रसिद्ध मराठी कलाकाराचे वक्तव्य चर्चेत

 ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ते शूटींगच्या निमित्ताने पंजाबमध्ये गेले आहेत.

Updated: Mar 3, 2024, 09:03 PM IST
'आपल्या महाराष्ट्राला आहे 'हा' शाप...', प्रसिद्ध मराठी कलाकाराचे वक्तव्य चर्चेत title=

'आई कुठे काय करते' ही मालिका कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेला ओळखले जाते. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सध्या मिलिंद गवळी हे पंजाबमध्ये फिरताना दिसत आहेत. 

मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी मुंबई विमानतळ ते पंजाबमधील चंदीगढ विमानतळाचा प्रवास दाखवला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी पंजाबमधील संस्कृती, त्या ठिकाणचे लोक आणि विविध गोष्टींबद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या या पोस्टमधील एका वाक्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

मिलिंद गवळी नेमकं काय म्हणाले? 

“वाहे गुरु दा खालसा वाय गुरुदी फत्ते” खूप वर्षांनी महाराष्ट्राच्या बाहेर पडलो खूप वर्षांनी “आई कुठे काय करते” च्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करातोय ! “आई कुठे काय करते” शूटिंग ला दोन दिवसाची सुट्टी होती आणि म्हणून मी आलो पंजाब मध्ये, सकाळी सकाळी चंदीगड एअरपोर्टला उतरलो आणि तिकडनं दोन तास प्रवास करून पटियाला ला पोहोचलो!

आपलं पंजाबी कल्चर आणि पंजाबी लोक हे खरेच larger-than-life आयुष्य जगत असतात! आणि मी पाहिलं आहे माझे दोन जुने मित्र बल्लू आणि रवींद्र सुरी, दोघेही कॅम्पस सिरीयल मध्ये माझ्याबरोबर होते, बल्लू च्या लग्नाला मला उशीर झाला म्हणून मी रात्री साडेनऊ दहा वाजता तिथे पोहोचलो बघतो तर त्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं, मला वाटलं मी उशिरा पोहोचलो, झालं लग्न लागून सगळे घरी निघून गेले, त्या हॉलमध्ये ग्रहस्त होता त्याला मी विचारलं “चले गये सब”, तर तो उतरला म्हणाला अभि शादी शुरू का हुई है रात को 12 बजे के बाद शुरू होगी बल्लू की शादी. त्या लग्नात इतकी धमाल होती , मी असं खाणं-पिणं नाचणं पाहिलंच नव्हतं कधी.

आज चंदीगड ते पटियाला येत असताना दोन्ही बाजूला इतक्या मोठ्या मोठ्या शेतजमिनी बघून छान वाटलं, नाहीतर आपल्या महाराष्ट्राला “ सख्खा भाऊ पक्का वैरी “चा शाप आहे, भावा भावाच्या भांडणामध्ये प्रत्येकाच्या वाटेला एक दोन चार एकर जमिनी येतात ! दोन दिवस shooting करून, पंजाबी पराठे सराटे खाऊन आपली भाकरी खायला येतो आपल्या महाराष्ट्रात परत !, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ते शूटींगच्या निमित्ताने पंजाबमध्ये गेले आहेत.