Aai Kuthe Kai Karte : रुपाली भोसले सेटवरून चोरते 'या' गोष्टी, स्वतःच केला खुलासा

अरूंधतीच्या अगदी जवळच्या गोष्टी चोरताना दिसते संजना 

Updated: Feb 10, 2022, 12:19 PM IST
Aai Kuthe Kai Karte : रुपाली भोसले सेटवरून चोरते 'या' गोष्टी, स्वतःच केला खुलासा  title=

मुंबई : स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलीय. असं असताना प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या खासगी आयुष्यातही फॉलो करत असतात. मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेबाबत एक अजबच माहिती समोर आली आहे. 

रुपाली भोसले सेटवरून काही गोष्टी चोरत असल्याची माहिती समोर आली आहे. याचा खुलासा स्वतः रुपाली भोसलेने एका मुलाखतीत केला आहे. 

आपल्या माहित आहे, मालिका म्हटलं की सेट आलं. पण आई कुठे काय करते ही मालिका 'समृद्धी' बंगल्यात शुट करण्यात येते. या सेटबाहेर कलाकार आणि स्पॉटबॉय दादांनी चक्क भाजी लावली आहे. 

सेटबाहेर वांगी, भेंडी, गवती चहा, मेथी, पालक, कांद्याची पात, लाल माढ यासारख्या भाज्या लावल्या आहेत. अनेकदा मालिकेत आपण अरुंधतीच्या किचनमध्ये भाज्या पाहिल्या आहे. अरूंधती भाज्या निवडताना दिसते. 

या भाज्यांची टरफल फेकून न देता ती पुन्हा मिनी शेतात लावली जातात. आतापर्यंत चवळीच्या शेंगा, गवती चहा यासारख्या लावल्या आहेत. या गोष्टी रुपाली भोसले अनेकदा आपल्या घरी देखील घेऊन गेली आहे. 

त्यामुळे रुपाली भोसले अरुंधतीच्या किचनमधील भाज्या चोरते. आणि तिने हे स्वतः मान्य केलं आहे. 

आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरूंधती आपल्या पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला गेली आहे. आशुतोष आणि अरूंधती पहिल्यांदाच घराबाहेर एकटे आहेत. असं असताना अनिरूद्ध घरात खूप चिडचिड करताना दिसतो.