मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अनेक प्रश्न उभे राहिले. या अगोदर फक्त अभिनेत्री कंगना रानौतच फक्त इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आणि ग्रुपिझमबद्दल बोलत होती. मात्र, आता हळूहळू अनेक कलाकार समोर येत आहे.
७० च्या दशकातील अभिनेत्री सिमी ग्रेवाल, शत्रुघ्न सिन्हासह अनेक कलाकारांनी म्हटलं की, ग्रुपिझम तर इंडस्ट्रीत खूप अगोदर पासून आहे. आता अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने देखील इंडस्ट्रीने त्याच्यासोबत केलेल्या गैरव्यवहाराला वाचा फोडली आहे. त्याने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर आरोप केले आहे.
फैजलने म्हटलं की, इंडस्ट्रीत पक्षपात आणि ग्रुपिझमसारख्या गोष्टी उपलब्ध आहे. यावेळी त्याने स्वतःसोबत घडलेला एक किस्सा सांगितला. त्याने सांगितलेला किस्सा हा आमिर खानच्या ५० व्या वाढदिवसाचा आहे. जर तुमचे काही सिनेमे फ्लॉप गेले असतील तर कुणीही तुमच्याशी चांगला व्यवहार करत नाही. करण जोहरने आमिर खानच्या त्या पार्टीत फैजलचा अपमान केला होता. या पार्टी दरम्यान फैजल एका व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र करण जोहरने तसं होऊ दिलं नाही.
पुढे फैजल सांगतो की, एक वेळ अशी देखील आली होती जेव्हा लोकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेणं बंद केलं होतं. अभिनेता आमिर खान आणि ट्विंकल खन्नाने एका सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. पण यानंतर सिनेमात काम मिळवण्यासाठी त्याला भरपूर संघर्ष करावा लागला होता. अनेकजण ऑफिसमध्ये बोलवायचे मात्र खूप वेळ बसवून ठेवायचे. दिग्दर्शकाशी भेटच व्हायची नाही.