आमिर खानने टोचले नाक-कान, अनेक रात्र न झोपता राहिला...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे प्रयोग करताना नेहमी दिसतो. पी.के. आणि दंगल या चित्रपटात आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची. सध्या आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची शूटिंग करत आहे.

Updated: Jun 28, 2017, 02:33 PM IST
आमिर खानने टोचले नाक-कान, अनेक रात्र न झोपता राहिला... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे प्रयोग करताना नेहमी दिसतो. पी.के. आणि दंगल या चित्रपटात आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची. सध्या आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची शूटिंग करत आहे.
या चित्रपटासाठी आमिर आता पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्यासाठी आमिरने कान आणि नाक टोचले आहेत. पण या लूकसाठी आमिरला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आमीरने चित्रपटासाठी आपले वजनही कमी केले आहे.
सोशल मीडियावर आमिरचे या लूकमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. आमिरचा हा आगळा वेगळा लूक समोर आल्यानंतर त्याची भूमिका काय असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
असे सांगितले जात आहे की अमिताभ बच्चन या सिनेमात कॉमेडीचा रोल साकारणार आहेत. पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ एकाच चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात कटरीना कैफ आणि फातिमा सना शेखसुद्धा दिसणार आहेत.