Aamir Khan gets trolled on his new look: आमिर खान हा अभिनेता सगळ्यांचाच लाडका आहे. परंतु सध्या आमिर खान हा अनेकदा नेटकऱ्यांच्या रडारवरच असतो. सध्या त्याच्या एका लुकवरून मात्र नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच झापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटकरी त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. त्यातून सध्या त्यानं काहीही केलं की त्याला ट्रोल केलंच जातं. यावेळी त्याचा लुक त्यानं पुन्हा एकदा बदलला आहे. त्याच्या बदलेल्या लुकवरून हिंट येऊ शकते की तो नव्या चित्रपटात व्यस्त असू शकतो. कारण याआधीही 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटावेळी आपला लुक बदलला होता. त्यानंतर 'दंगल', 'लाल सिंग चड्ढा' अशा चित्रपटांसाठीही त्यानं आपला लुक हा बदलला होता. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची जेवढी चर्चा रंगलेली असते. सध्या त्याच्या लुकनंही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे परंतु काहींना आमिरला ट्रोल केलंय.
आमिर खान वेगवेगळे लुक कॅरी करताना दिसतो. कधी सॉल्ट पेपर बिअर्ड किंवा नुसतीच मुशताच आणि चष्मा अथवा दाढी, मिशी न ठेवता फक्त चष्मा. त्याच्या हेअरस्टाईल्सचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्यानं फार क्लासी आणि हटके असा लुक कॅरी केलेला असला तरीसुद्धा त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. त्याला अनेकांनी सरळ सरळ जॉकरचं म्हटलं आहे. यावेळी त्याचा लुक हा थोडा फंकी आहे. म्हणजे निळ्या स्ट्राईपचा पांढरा शर्ट घातला आहे त्याखाली त्यानं ब्लू ट्राऊझर्स घातले आहेत. सोबतच त्यानं ब्लॅक स्पेस घातले असून त्यानं आपली हेअरस्टाईलच पुर्णपणे बदलली आहे. यावेळी त्यानं मिडल पार्टेट लॉन्ग वेवी हेअरडो हा लुक केला आहे. सोबतच त्याचा हा गीक लुक पाहून चाहतेच हैराण झाले आहेत.
यावेळी त्याच्या या लुकचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले आहे. सोबतच त्याच्या या लुकवरून त्याला ट्रोलही करण्यात आले आहे. यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत आमिर खाननं हजेरी लावली होती. यावेळी तो त्यांच्या घराच्या बाहेर येताच नेटकऱ्यांनी त्याचा लुक पाहून त्याला ट्रोल करायला सुरूवात केली होती. अनेक त्याच्या फॅन्सनी त्याला पाहताच त्याच्याशी हातमिळवणी केली. तेव्हा आमिर खाननंही आपल्या फॅन्सला ग्रीट केले.
सध्या आमिर खानही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. राजकूमार हिरानीसोबतही तो एक चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. सोबतच सनी देओल आणि त्याच्या चित्रपटाचीही काहीशी चर्चा रंगलेली आहे.
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.