मुंबई : 52 वर्षाचा आमीर खान आपल्या कुटुंबासोबत कुन्नूर येथे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आमीर खानसोबत यावेळी 6 वर्षाचा आझार आणि पत्नी किरण राव देखील आहे. आमीर यावेळी आपल्या सुपर डुपर हिट सिनेमा कयामत से कयामत तकच्या आठवणी ताज्या करत आहे.
आमीर खानने कुन्नुरमध्ये आपल्या चुलत भावाचा म्हणजे कयामत से कयामत तक या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मनसूर खान यांचा वाढदिवस साजरा केला आहे. आमीर खानने हे फोटो स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि म्हटलंय की कयामत से कयामत तक या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा 60 वा वाढदिवस साजरा करतोय....
Celebrating Mansoor's 60th. pic.twitter.com/BGdSXUiBNl
— Aamir Khan (@aamir_khan) May 30, 2018
1988 मधील कयामत से कयामत तक या सिनेमाने आमीर खानला ओळख मिळवून दिली. या सिनेमाने त्याला स्टार केला. या सिनेमानंतरच आमीर खानचं रस्त्यावर सर्रास फिरण कठीण झालं. आमीरने सांगितलं की, सुरूवातीच्या काळात त्याला एका महिन्याकरता 1 हजार रुपये मिळत होते. म्हणजे 11 महिन्याच्या शुटिंग करता 11 हजार रुपये मिळायचे. आमीर खानसाठी कयामत से कयामत तक हा सिनेमा खास ठरला आहे. या सिनेमाचं लेखन आणि त्याची निर्मिती आमीर खानचे काका, मनसूरचे वडिल नासीर हुसैन यांनी केली आहे.