इंस्टाग्रामवर आमिर खाननं शेअर केली 'ही' खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून  महाराष्ट्रभरात काम करत आहे.

Updated: Mar 30, 2018, 10:02 PM IST
इंस्टाग्रामवर आमिर खाननं शेअर केली 'ही' खास पोस्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून  महाराष्ट्रभरात काम करत आहे. पाणी फाऊंडेशनने अनेक दुष्काळग्रस्त भागात काम केले. नुकताच जखानगाव परिसरात त्याने लहान मुलांसोबतचा एक खास फोटो क्लिक केला. आमिर खानने चाहत्यांसोबत हा फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअरदेखील केला आहे. 

नुकतीच इंस्टाग्रामवर एन्ट्री 

आमिर खानच्या वाढदिवसादिवशी इंस्टाग्रामवर एंट्री घेतली आहे. यामध्ये पहिल्यांदा आमिर खानने त्याच्या आईचा फोटो शेअर केला होता. नुकताच त्याने जखनगावातील लहान मुलांच्या चेहर्‍यावरील हास्य टिपले आहे. इंस्टाग्राम पोस्टवर हा फोटो शेअरदेखील केला आहे.  

ठ्ग्स ऑफ हिंदोस्तानचं शूटिंग  

महाराष्ट्रातील कटगुन गावानंतर आमिर खान पाणी फाऊंडेशनचं काम सातार्‍यातील जखनगावामध्ये पोहचला आहे. स्थानिक लोकांसोबत तो पाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत जागरूकता पसरत आहे. 

चाहत्यांना त्याने श्रम दान करण्याचे आवाहनदेखील केले आहे. तीन वर्षात पाणी फाऊंडेशन 75 तालुक्यांमध्ये पोहचला आहे. सध्या आमिर खान ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.  या चित्रपटात पहिल्यांदा आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहे. शूटिंग आणि कामामध्ये व्यग्र असला तरीही अनेक सामाजिक सेवांमध्ये आपलं योगदान देण्यासाठी तो वेळ राखून ठेवतो. अशाच प्रेरणादायी कहाण्या समाजासमोर ठेवण्यासाठी झी मराठीवर लवकरच 'तुफान आलंया ' हा कार्यक्रम सुरू होणार आहे.