नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने पुन्हा एकदा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री कृती सेनॉन आणि टायगर श्रॉफ यांनी 'हीरोपंती' सिनेमात काम केलं. २०१४ मध्ये आलेल्या 'हीरोपंती' सिनेमातून कृती आणि टायगरने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
'बागी ३' सिनेमात भूमिका करण्यावर कृतीला विचारले असता तिने म्हटलं की, "निश्चितच पुन्हा एकदा टागयर श्रॉफसोबत सिनेमात काम करण्यास आवडेल. टायगर सोबत काम करुन खूप दिवस झाले आहेत. 'हीरोपंती २' सारखे आणखीन सिनेमा बनले पाहिजेत."
'बागी-२' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान कृतीने टायगरचं कौतुक करताना म्हटलं, "आम्ही दोघांनी एका सिनेमातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ही एक खास गोष्ट आहे. मला टायगरचा अभिमान आहे कारण, प्रत्येक सिनेमातील भूमिकेत तो एक वेगळी छाप सोडतो."
कृती सेनॉन लवकरच 'हाऊसफुल्ल-४' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात भूमिका मिळल्याने कृती खूपच आनंदी आहे. या सिनेमात अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांचीही भूमिका असणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.