Aamir Khan Viral Video : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. आमिर खानचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. त्याचं कारण म्हणजे आमिर या व्हिडीओत धडपडताना दिसला आहे. त्या व्हिडीओमुळे आमिर हा नशेत असल्याचे म्हटले जात आहे.
आमिरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फॅशन पेज फिल्मी ग्यॉनवरून शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडीओत आमिरनं पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. आमिर एका पार्टीतून बाहेर येत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील एका पार्टीतील असल्याचे म्हटले जात आहे. आमिर खानला अशा पद्धतीनं धडपडताना पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. पण या व्हिडीओत पाहायला मिळते की आमिर हा त्या पाार्टीच्या व्हेन्यूटच्या दरवाज्यातून बाहेर येत आहे. त्यावेळी कोणालातरी आत जाण्यासाठी रस्ता हवा म्हणून तो मागे सरकला आणि त्यात तो धडपडतो.
आमिरच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांना त्याच्या पीके या चित्रपटाची आठवण आली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणाले की एकदा की 'आपलं जेवण आणि दारुपिऊन झाली की आपण असं असतो.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'तो मद्यधुंद अवस्थेत आहे ना?' तिसरा नेटकरी म्हणाला की 'भाऊ, जर झेपत नाही तर पितो कशाला.' तिसरा नेटकरी 'पीके' या चित्रपटातील डायलॉग बोलत म्हणाला की 'हमको नहीं रहना इस गोला पर ई कोनौ फिरकी ले रहा है.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'ओ तेरी, मैं तो हिल गया.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आज जास्त झाली.'

हेही वाचा : 'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय
आमिरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं काही दिवसांपूर्वीच लाहौर 1947 या चित्रपटाची घोषणा केली. सनी देओल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे तर राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आमिर खान या चित्रपटात अभिनय करणार नसून चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 150/7
|
VS |
UAE
151/5(19.4 ov)
|
| United Arab Emirates beat Canada by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 169/2
|
VS |
AUS
146(19.3 ov)
|
| Zimbabwe beat Australia by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.