मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. आयरा नेहमी तिचा बॉयफ्रेन्ड नुपूरसोबत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेते. नुकताचं तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून 'आस्क मी एनीथिंग' सेशनद्वारे चाहत्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली. यावेळी आयराला 'तू डिप्रेशनवर कशी मात केली?' असा प्रश्न विचारला. तेव्हा कोणतीही गोष्ट न लपवता आयराने उडघपणे चाहत्याच्या प्रश्नाचं निराकरण केलं आहे.
यावर आयरा म्हणाली, 'स्वतःला ओळखायला शिका.. तुम्हाला काय करायला आवडतं याकडे अधिक लक्ष द्या. तुम्हाला कोण आवडतं? तुम्हाला काय हवं आहे? त्यानंतर आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायला शिका.. असं मला वाटतं...' एवढंच नाही तर आयराने एका मेन्टलहेल्थ नावाच्या हॅशटॅगचा वापर केला.
गेल्या चार वर्षांपासून आयरा करत होती डिप्रेशनचा सामना
'मी गेल्या चार वर्षांपासून डिप्रेशनचा समाना करत आहे. त्यासाठी मी अनेक डॉक्टरांकडेही गेले. मी क्लिनिकली डिप्रेस्ड आहे. पण, आता मी अगदी व्यवस्थित आहे. मागील एक वर्षापासून मला मानसिक आरोग्यासाठी काहीतरी करायचं होतं. पण, नेमकं काय हे मात्र मला कळत नव्हतं. तेव्हाच माझ्या या प्रवासावर तुम्हालाही घेऊन जावं, पाहू काय होतं ते असा विचार माझ्या मनात आला', असं इरा म्हणाली.