मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) याचा लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापुर्वींच वादात अडकला होता. त्यामुळे रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर नेटफ्लि्क्सवर एक वेगळाच चित्रपट ट्रेंडमध्ये आलाय. तब्बल 28 वर्ष जूना चित्रपट प्रेक्षक बघतायत. नेमका हा चित्रपट प्रेक्षक का पाहतायत ते जाणून घेऊयात.
चित्रपट कोणता?
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मुळे (Laal Singh Chaddha) एक चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंडमध्ये आला आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणी नसून फॉरेस्ट गंप हा हॉलीवूड सिनेमा आहे. हा तोच चित्रपट आहे ज्यावर लाल सिंह चड्ढा बनवला गेला आहे. फॉरेस्ट गंप हा चित्रपट संध्या OTT प्लॅटफॉर्म Netflix वर ट्रेंडमध्ये आहे.
28 वर्ष जुना सिनेमा कसा?
नेटफ्लिक्सवर 'फॉरेस्ट गंप' (forrest gump) हा हॉलिवूड चित्रपट सध्या ट्रेंडमध्ये आहे. विशेष बाब म्हणजे नेटफ्लिक्सवरील हा चित्रपट जगातील अनेक भाषांसह हिंदीतही उपलब्ध आहे. टॉम हँक्स, रॉबिन राईट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. गॅरी सिनिस, मायकेल्टी विल्यमसन आणि सॅली फील्ड मुख्य भूमिकेत आहेत. फॉरेस्ट गंप 6 जुलै 1994 रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट झेमेकिस यांनी केले आहे.
पुरस्कार
'फॉरेस्ट गंप'ची (forrest gump) कथा विन्स्टन ग्रूमच्या 1986 मध्ये आलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. फॉरेस्ट गम्पने सहा ऑस्कर जिंकले. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन यांचा समावेश आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला आणि त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला.
आमिर खानच्या (aamir khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) वरून दोन गट पडल्याचे दिसत आहे. काहींनी हा चित्रपट बॉयकॉट केलाय, तर काहींनी हा चित्रपट पाहणे पसंत केले आहे. त्यामुळे या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 11.50 कोटींची कमाई केली आहे.