'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका

मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Nov 29, 2020, 09:34 PM IST
'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका

मुंबई : 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र अचानकच सेटवर त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तात्काळ मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ५२ वर्षीय राहुलला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. १९९० साली रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'आशिकी' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

महेश भट्ट यांच्या 'आशिकी'  चित्रपटामध्ये उल्लेखनिय काम केल्यानंतर 'सपने साजन के', 'फिर तेरी कहानी याद आई', 'जनम', 'प्यार का साया', 'जुनून', 'पहला नशा', 'गुमराह' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका  बजावल्या आहेत.