रणबीर आणि आलिया आता शेजारी-शेजारी

कित्येक वर्षांपासून रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत.     

Updated: Nov 29, 2020, 06:26 PM IST
रणबीर आणि आलिया आता शेजारी-शेजारी

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कपल म्हटलं तर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं. कित्येक वर्षांपासून रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत. एवढचं नाही तर गेल्या वर्षी त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील वाऱ्यासारखी पसरल्या होत्या. चाहत्यांना आता देखील त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा आहे. पती - पत्नी होण्या आधी या दोघांनी शेजारी होण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने रणबीरच्या बाजूलाचं नवं घर घेतलं आहे. 

आमची सहयोगी वेबसाईट बॉलिवूड लाईफने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार आलियाने वांद्रे येथील पाली हिल स्थित परिसरातील अपार्टमेंटमध्ये घर घेतलं आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये रणबीर देखील राहत आहे. आलियाचं नवं घर २ हजार ४६० चौरस फूट जागेत पसरलेलं आहे.

आलियाच्या नव्या घराची किंमत तब्बल ३२ कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत असून रणबीरचं घर ७व्या मजल्यावर आहे. तर आलियाचं घरं ५ व्या मजल्यावर आहे. सध्या आलिया तिच्या जुहूयेथील घरात राहते. ती लवकरच तिच्या नव्या घरात रहायला जाणार आहे. 

तिच्या नव्या घराच्या इंटेरिअरची जबाबदारी गौरी खानच्या खांद्यावर आहे. यासोबतच आलियाने तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये हवन आणि लक्ष्मीची पूजा देखील केली आहे. शिवाय येत्या काळात ती नव्या थाटणीच्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.