अभिज्ञा भावेच्या लग्नाचा टीझर पाहिलात का?

'खुलता कळी खुलेना' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री 

Updated: Feb 1, 2021, 06:31 PM IST
अभिज्ञा भावेच्या लग्नाचा टीझर पाहिलात का?  title=

मुंबई : अनेक मराठमोळे कलाकार या नवीन वर्षात लग्नबंधनात अडकले. ६ जानेवारीला अभिनेत्री अभिज्ञा भावेचं (Abhidnya Bhave)  लग्न मेहुल पैसोबत थाटामाटात पार पडले. अभिज्ञाचे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले आता अभिज्ञाच्या लग्नाचा टीझर (Abhidnya Bhave - Mehul Pai Wedding Teaser) सगळ्यांच लक्ष वेधत आहे. 

अभिज्ञाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘६ जानेवारी २०२१. माझ्या आयुष्यातील काही आनंदाचे, भावनिक आणि खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. (रंग माळियेला.... सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा टीझर) 

 

या टीझरमध्ये अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाच्या तयारी पासून लग्नाच्या इतर विधी देखील दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये अभिज्ञाने पर्पल- गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली आहे. या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तर मेहुलनेदेखील तिला मॅचिंग कपडे परिधान केले होते. त्यांच्या लग्न सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये अभिनेता संजय मोने, अभिनेत्री मयुरी देशमुख, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदे या सारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिज्ञा आणि मेहुल रिलेशनशिपमध्ये होते. अखेर दोघांनी कमी लोकांच्या उपस्थितीत पण साग्रसंगीत पद्धतीने लग्न केलं. घरी ग्रहमख पूजाही केली गेली. या विधीपासूनच अभिज्ञाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. त्यानंतर मेहंदीचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केली.