मुंबई : अभिषेक बच्चन याने बॉलिवूडमध्ये अनेक चांगले चित्रपट दिले. मात्र तरी देखील त्याला हवी तशी ओळख आणि नाव तेथून कमावता आलेलं नाही. त्याचे वडिल अमिताभ बच्चन हे त्यांच्या काळातील असे अभिनेता होते ज्यांनी प्रत्येक तरुणीच्या मनावरती राज्य केलं होतं आणि अजूनही त्यांचे अनेक चहाते आहेत. ज्यामुळे नेहमीच लोक अभिषेकची त्याच्या वडिलांसोबत बरोबरी करु लागले. परंतु असे असले तरी अभिषेक एक उत्तम अभिनेत आहे हे. त्याने अनेक वेगवेगळ्या सिनेमा आणि वेबसिरीजमधून सिद्ध केलं आहे.
अभिषेकने विश्व सुंदरी ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं आणि या दोघांना एक मुलगी देखील आहे. या दोघांचा संसार खूपच सुंदर सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर फारसे एक्टिव्ह नसतात. परंतु तरी देखील त्यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु असतात.
आता सध्या अभिषेक चर्चेचा विषय ठरला आहे. तो, त्याने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरामुळे. खरंतर एका मुलाखतीत एका पत्रकाराने अभिषेकला त्याची बायको ऐश्वर्याबाबत प्रश्न विचारला, त्यावर अभिषेकने जे उत्तर दिले. ज्यामुळे तो एक बेस्ट नवरा सिद्ध झाला आहे.
लग्नानंतर पहिल्यांदाच जेव्हा अभिषेक-ऐश्वर्या ओप्रा विन्फ्रेच्या शोमध्ये पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी या दोघांना अनेक वैयक्तीक प्रश्न विचारले. पण प्रत्येक प्रश्नाला या स्टार जोडप्याने इतक्या सुंदरपणे उत्तर दिले की, ओप्राही खूप प्रभावित झाल्या.
असाच एक प्रश्न करताना त्यांनी अभिषेकला विचारले, 'जगातील सर्वात सुंदर महिलेशी लग्न करताना तुला कसं वाटलं?' यावर अभिनेत्याने न डगमगता उत्तर दिले आणि म्हणाला, 'डोळांना खूप चांगलं वाटत आहे.'
मात्र, अभिषेक एवढ्यावरच थांबला नाही. जेव्हा ओप्राने त्याला पुन्हा चिडवले आणि सांगण्याचा प्रयत्न केला की, सकाळी ऐश्वर्याच्या शेजारी उठणे देखील किती चांगले असेल, तेव्हा अभिनेता लगेच म्हणाला, 'अगदी. ती खूपच सुंदर आहे आणि सकाळी देखील तितकीच सुंदर दिसते. जेव्हा मी तिला सकाळी पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की, सकाळी देखील इतकी सुंदर कशी?'
हे ऐकताच ऐश्वर्या हसली आणि ती म्हणाली, "म्हणूनच मी याच्याशी लग्न केलं. तो सर्व काही अशा प्रकारे मजेदार बनवतो". या मुलाखतीत असे अनेक क्षण आले, जेव्हा ऍश तिच्या नवऱ्याच्या उत्तराने प्रभावित झाली आणि हे स्पष्ट झाले की, ज्युनियर बच्चन तिच्या नजरेत एक अद्भुत नवरा आहे.
उदाहरणार्थ, जेव्हा ओप्राने अभिषेकला विचारले की त्याने ऍशसारखे सुंदर डोळे इतरत्र कुठे पाहिले आहेत का? त्यावेळी अभिनेत्याने नाही बोलत मान हलवली आणि पत्नीकडे बोट दाखवले. यावर हसत ऐश्वर्या म्हणाली, 'तो हुशार आहे, तो नाही मध्येच उत्तर देईल'.