close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विवेकच्या 'त्या' ट्विटवर अभिषेक उत्तर देणार होता पण...

विवेकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती.

Updated: May 26, 2019, 04:52 PM IST
विवेकच्या 'त्या' ट्विटवर अभिषेक उत्तर देणार होता पण...

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेता अभिषेक बच्चन याने विवेक ओबेरॉयच्या 'त्या' वादग्रस्त ट्विटवर कोणतीच प्रतिक्रिया कशी दिली नाही, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. मुळात एकिकडे विवेकच्या विरोधात कलाकारांची फौज उभी राहिलेली असताना, अभिषेकचं या प्रकरणी असणारं मौन अनेक चर्चांना वाव देऊन गेलं. पण, यामागे मात्र काही वेगळी कारणं होती. पत्नी एश्वर्याने अभिषेकला कोणत्याही प्रकारचं उत्तर न देण्यास सांगितलं होतं.

काही दिवसांपूर्वी विवेकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. एश्वर्या 'कान' फेस्टिवलमध्ये व्यस्त असल्यामुळे या घडल्या प्रकरणाबद्दल तिला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. जेव्हा तिला हे कळालं तेव्हा तिनं अभिषेकला कोणत्याही प्रकारचं वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला. 

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचं हे पब्लिसिटी स्टंट असण्याचं कारण सांगत, तिने अभिषेकला कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला दिला. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यात आले, तर तो त्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरेल. असं एश्वर्यानं अभिषेकला सांगितलं. विवेककडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आलं होतं.