close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून प्रियंकाने 'भारत' सोडला - सलमानची खंत

काही दिवसांपूर्वी सलमान आणि प्रियंकामध्ये खटके उडाल्याच्या चर्चा होत्या.

Updated: May 26, 2019, 04:50 PM IST
...म्हणून प्रियंकाने 'भारत' सोडला - सलमानची खंत

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने अभिनेता सलमान खानचा चित्रपट 'भारत' सोडून बराच काळ झाला असला तरी, अजूनही सलमान खान याबाबत प्रियंकावर टीका करताना दिसतो. आता पुन्हा एकदा सलमानने प्रियंकाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 'भारत' प्रियंकासाठी सर्वात महत्तवाचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सलमानने म्हटलंय. 

प्रियंका या चित्रपटासाठी अतिशय उत्सुक होती. पण त्यानंतर चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याआधीच तिने नकार दिला. प्रियंका या चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य नसल्याचं वाटतं का? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. त्यावर सलमानने 'असं नाही, परंतु प्रियंकाला या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. आधी मी आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी चित्रपटात कतरिनाला घेण्याचा विचार करत होतो, पण अलीने या चित्रपटासाठी एका भारतीय मुलगी हवी' असं म्हटल्याचं सलमानने सांगितलं.

फिल्म 'भारत' का एंथम सॉन्ग आज होगा रिलीज, जबरदस्त म्यूजिक डोज के लिए हो जाइये तैयार!

'भारत'चं शूटिंग सुरु होण्याच्या पाच दिवस आधी प्रियंकाने चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर तिने निकसोबत लग्न केलं. आम्हाला याबाबत वाईट वाटू शकतं याचा तिनं विचार करायला हवा होता असं सलमानने सांगितलं. 'तिने तेच केलं जे तिला करायचं होतं आणि कतरिनाला तेच मिळालं ज्यावर तिचा हक्क होता' असं सलमानने म्हटलंय. 'लग्न करण्यासाठी प्रियंकाने 'भारत'ला नकार दिला. आम्ही तिला चित्रपटाच्या तारख्या बदलण्याबाबतही विचारलं होतं परंतु त्याबाबतही निश्चिती नसल्याचं प्रियंकाने म्हटल्याचं' सलमानने स्पष्ट केलं.

तसंच सलमानने जरी प्रियंका आता चित्रपटाचा भाग नसली तरी तिला 'भारत'चं स्क्रिप्ट आवडलं होतं, त्यामुळे ती चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी मदत करु शकते असं सलमानने म्हटलंय. येत्या ईदला ५ जून रोजी 'भारत' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.