घोड्यावर बसलेल्या या मुलाला ओळखलंत का? आज 11 वर्ष मोठ्या अभिनेत्रीला करतोय डेट

या अभिनेत्याचे आकर्षण इतके आहे की बॉलीवूडमधील प्रत्येक सुंदरी त्याच्यावर फिदा झाली आहे

Updated: Jan 30, 2022, 01:02 PM IST
  घोड्यावर बसलेल्या या मुलाला ओळखलंत का? आज 11 वर्ष मोठ्या अभिनेत्रीला करतोय डेट title=

मुंबई : फोटोत घोड्यावर बसलेला हा गोंडस लहान मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. त्याने आपलं मोठं फॅन फॉलोविंग तयार केलं आहे.

पण आजकाल व्यावसायिक जीवनापेक्षा या अभिनेत्याच्या वैयक्तिक जीवनात चाहत्यांना अधिक रस आहे.हा मुलगा त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीला डेट करत आहे.  या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी खूप मेहनत केली आहे.

दबंग खानने त्याला फिट बॉडी मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. तसेच, या अभिनेत्याने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात प्रियांका चोप्राच्या धाकट्या बहिणीसोबत केली होती. एवढ्या इशाऱ्यांनंतर तु्म्हाला कदाचित या अभिनेत्याची ओळख पटली असेल.

या अभिनेत्याचे आकर्षण इतके आहे की बॉलीवूडमधील प्रत्येक सुंदरी त्याच्यावर फिदा झाली आहे.या मुलाची बॉलिवूड अभिनेत्रींच्या फोटोंवर मजेशीर कमेंट्स करण्याची पद्धत चाहत्यांनाही आवडते.

त्यामुळे तुमचा गोंधळ न वाढवता, आम्ही तुम्हाला या अभिनेत्याचे नाव सांगतो.

फोटोत दिसणारा हा मुलगा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आहे. अर्जुन कपूर बॉलीवूड अभिनेत्री आणि सलमान खानच्या माजी मेव्हणीला म्हणजेच मलायका अरोराला डेट करत आहे. 

I Will Be Under Home Quarantine": Arjun Kapoor Tests Positive For COVID-19

सध्या या दोघांच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. दुसरीकडे, अर्जुनच्या फॅट टू फिट जर्नीबद्दल बोलताना, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अर्जुन कपूरचे वजन किती जास्त होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण सलमान खानने त्याला खूप प्रेरित केले आणि त्याला बॉलिवूडचा स्टार बनवले.